महाराष्ट्र
6048
10
इगतपुरी तालुकास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा क्रिडा शिक्षक सहविचार सभा
By Admin
इगतपुरी तालुकास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा क्रिडा शिक्षक सहविचार सभा
इगतपुरी तालुका न्युज नेटवर्क- विद्यार्थ्यांसाठी खेळाचे नियम हे खेळाची निष्पक्षता, सुरक्षा आणि शिस्त राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात.स्पर्धामध्ये खेळताना प्रत्येक खेळानुसार (उदा. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी) नियम वेगळे असतात.स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी नोंदणी करणे आणि स्वतःचे वैध ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे.नियोजित वेळेच्या किमान एक तास आधी विद्यार्थ्यांनी मैदानावर उपस्थित ठेवणे आवश्यक आहे.विद्यार्थी खेळाडूंना स्वतःच्या वयोगटानुसार (उदा. १४, १७ किंवा १९ वर्षांखालील) आणि वजनगटानुसारच खेळवणे आवश्यक आहे.पंचांचा निर्णय अंतिम मानणे, प्रतिस्पर्धी खेळाडूंचा आदर करणे आणि मैदानावर गैरवर्तन न करणे बंधनकारक आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास खेळाडूला किंवा संघाला अपात्र ठरवले जाऊ शकते.विद्यार्थ्यांचे जन्म दाखला पञ महत्त्वाचे असून ते खेळाडूंना आवश्यक आहे.नसेल तर शाळेचा निर्गम उतारा महत्त्वाचा मानला जातो.जिल्हा क्रिडा कार्यालयाची दिलेली माहीतीपुस्तिका यामध्ये खेळाडूसाठी नियमावली दिली आहे.तसेच स्पर्धा कालावधी व ठिकाण दिलेले आहे.विद्यार्थ्यांना क्रिडा स्पर्धासाठी जन्म दाखला आवश्यक आहे.क्रिडा शिक्षकांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी जिल्हा क्रिडा विभाग महत्त्वाची भुमिका बजावत आहे.
अशी माहीती जिल्हा क्रिडा अधिकारी सर्वैश देशमुख यांनी तालुकास्तरीय शालेय स्पर्धा नियोजन बैठक प्रसंगी माहीती सांगितली.
नाशिक जिल्हा क्रिडा विभाग यांच्या मार्फत
इगतपुरी तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धा नियोजन संदर्भात बैठक इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील श्री सिद्धीविनायक माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर काॕलेज येथे क्रिडा शिक्षक समवेत पार पडली.कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक पी.जे.देवरे होते.
यावेळी उपस्थित क्रिडा अधिकारी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.जिल्हा क्रिडा अधिकारी अविनाश टिळे, सर्वैश देशमुख,तालुका क्रिडा स्पर्धा प्रमुख डी.आर.तेलोरे,विजय सोनवणे,मुख्याध्यापक पी.जे.देवरे,एन.जी.उशीर तसेच इतर पदाधिकारी व तालुक्यातील क्रिडा शिक्षक यावेळी उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सुञ संचालन आर.डी.महाजन उपस्थित सर्व मान्यवर व क्रिडा शिक्षक यांचे आभार अमोलराजे म्हस्के यांनी केले.
Tags :
6048
10




