कवडदरा विद्यालयातील युवराज शिंदे ची नाशिक जिल्ह्यातून विभागस्तरावर निवड
कवडदरा- कवडदरा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कुस्ती क्रिडा प्रकारात विद्यार्थी खेळाडू (१४ वर्षे वयोगटातील युवराज चंद्रभान शिंदे
याची जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल विभागस्तरावर निवड आहे.
नाशिक जिल्हा क्रिडा विभाग यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती क्रिडा स्पर्धेत (दि.२३) शनिवार रोजी
भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा विद्यालयाच्या इयत्ता सहावी वर्गातील विद्यार्थी खेळाडू युवराज चंद्रभान शिंदे विद्यार्थी खेळाडूची नाशिक जिल्हा या मधून विभागस्तरावर निवड झाली. या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव व गुणगौरव करण्यात येत आहे.त्याला मिळालेल्या यशामध्ये अनेक अडचणी आल्या.त्याच्यामध्ये असलेला प्रचंड आत्मविश्वास,ध्येयशक्ती च्या जोरावर त्याने यश मिळवले आहे.त्याला क्रिडा मार्गदर्शक अमोल म्हस्के यांचे विशेष सहकार्य मिळाले.त्याचे आई,वडील,पालक, ग्रामस्थ,माजी विद्यार्थी,माजी शिक्षक,माजी प्राचार्य तसेच विद्यालय संस्था पदाधिकारी भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.राजेंद्र नलगे साहेब, सचिव मा. प्रकाश जाधव साहेब,संस्था संचालक मा.प्रा.अशोक तुवर तसेच सर्व संस्था पदाधिकारी तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य बी.एस.पवार तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धासाठी शुभेच्छा दिल्या.