श्री आनंद महाविद्यालयाच्या शॉर्ट फिल्मला राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक
पाथर्डी प्रतिनिधी:
श्री आनंद महाविद्यालयाच्या टि वाय बी एस्सीच्या शॅार्ट फिल्मला महाराष्ट्र शासनाचा जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय दोन्ही पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले.
उच्चशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि युनिसेफ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाच्या श्री आंनद महाविद्यालयाच्या आनंद ग्रीन क्लब ला महाराष्ट्र शासनाचा व्हिडीओ/ रिल्स स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय प्रथम व राज्यस्तरीय प्रथम असे दोन्ही पुरस्कार जाहीर झाले आहेत. या निमित्ताने शिवाजीनगर येथील (C O E P ) तंत्रज्ञान विद्यापीठात ना.चंद्रकांत दादा पाटील, मंत्री उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, श्री. बी. वेणुगोपाल रेड्डी, अप्पर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण महाराष्ट्र राज्य, डॉ. सुनील भिरूड कुलगुरू सी ओ इ पी विद्यापीठ पुणे, शैलेंद्र देवळाणकर शिक्षण संचालक, उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या सर्वांच्या उपस्थितीत महाविद्यालयातील टि वाय बी एस्सीच्या माजी विद्यार्थ्यांनी कु. प्रिया ढाकणे, कु. वैष्णवी सातपुते, कु. ऋतुजा मरकड, कु. जयश्री औटी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा. शेषराव पवार, पाथर्डी- शेवगाव तालुका ग्रीन क्लब मास्टर ट्रेनर प्रा. सूर्यकांत काळोखे, ग्रीन क्लब फैकल्टी कोऑर्डीनेटर प्रा. डॉ. अजिंक्य भोर्डे या सर्वांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
या यशाबद्दल संस्थेचे सचिव सतीश गुगळे, उपाध्यक्ष चंपालाल गांधी,खजिनदार सुरेश कुचेरिया,ट्रस्टी धरमशेठ गुगळे, राजूशेठ मुथा, डॉ. ललित गुगळे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.