महाराष्ट्र
215642
10
समर्पण भावनेने केलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी-सतिश गुगळे
By Admin
समर्पण भावनेने केलेले कार्य समाजासाठी प्रेरणादायी-सतिश गुगळे
श्री तिलोक जैन विद्यालयात भव्य सेवापूर्ती सोहळा
पाथर्डी प्रतिनिधी:
संस्थेमधील कोणताही कर्मचारी ज्यावेळी समर्पण भावनेने काम करतो, त्यावेळी ते काम समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरते. अशा प्रकारचे कार्य राष्ट्रसंत ,आचार्य सम्राट, १००८ प. पू. श्री आनंदऋषीजी म.सा.यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवून विद्यालयाचे प्राचार्य अशोक दौंड व तंत्र विभागातील निदेशक पांडुरंग काकडे यांनी केलेले आहे, असे प्रतिपादन श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतिश गुगळे यांनी केले.
३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर या उभयतांचा सेवापूर्ती सोहळा श्री तिलोक जैन विद्यालयाच्या भव्य प्रांगणात आयोजीत करण्यात आलेला होता. यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर जि .प . अहिल्यानगर मा.सभापती अर्जुनराव शिरसाट,मा. सभापती पंचायत समिती गोकुळ दौंड, पाथर्डी, विश्वस्त धरमचंद गुगळे, श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळ, कार्यकारी मंडळाचे सदस्य संपतलाल गांधी, घेवरचंद भंडारी, डॉ. सचिन गांधी, चांदमल देसर्डा, डॉ.अभय भंडारी, ज्येष्ठ पत्रकार अविनाश मंत्री, अनिल खाटेर, प्राचार्य अजय भंडारी, उपमुख्याध्यापक अशोक गर्जे, पर्यवेक्षक मनिषा मिसाळ,भारत गाडेकर, सुधाकर सातपुते, सर्जेराव दहिफळे, मा.प्राचार्य शामराव बडे, शिवाजी पंडीत, प्रसाद आव्हाड, संजय आव्हाड, भगवान बडे,गोवर्धन देखणे, अनिल शिरसाट, महेंद्र शिरसाट , बबन भुसारी, अशोक दौंड व पांडुरंग काकडे यांचे सर्व आप्तेष्ट,स्नेहीजन, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, आनंद बाबा वरती नितांत श्रद्धा ठेवून या दोघांनी केलेले कार्य ही संस्था कधीही विसरू शकणार नाही. या प्रसंगी शिक्षक वक्ते म्हणून विद्यालयातील शिक्षक डॉ. अनिल पानखडे यांनी प्राचार्य यांच्या कार्याची माहिती दिली.नाविन्याचा ध्यास आणि आधुनिकतेची कास धरणारे प्रतिभावान कर्तव्यदक्ष प्राचार्य अशी ओळख निर्माण करत आपल्या कार्यकाळात विज्ञान प्रदर्शन, एन्स्पायर अवॉर्ड या सारख्या उपक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत देश पातळीवर अनेक पारितोषिक मिळवली. कोव्हिड-१९ च्या काळातील ऑनलाईन शिक्षण, नीट आणि एम एच सी इ टी मार्गदर्शन सुविधा, डिजिटल स्कूल, ग्रीन स्कूल - क्लीन स्कूल असे अनेक उपक्रम राबवून विद्यार्थी विकासाच्या अनेक योजना राबवल्या. रशिया, मॉरिशियस , आणि हाँगकाँग या देशांचा अभ्यास दौरा करून संस्थेसाठी महत्वपूर्ण योगदान दिले.अनेक पुरस्काराने सन्मानित असणारे प्राचार्य अशोक दौंड यांचे कार्य सर्वांना प्रेरणादायी ठरेल, असं ते म्हणाले.
यावेळी पियुष दौंड, डॉ.जी.पी . ढाकणे, अर्जुनराव शिरसाट यांनी देखील त्यांच्या जीवन कार्यावरती प्रकाश टाकला.या वेळी सत्काराला उत्तर देतांना प्राचार्य अशोक दौंड यांनी या संस्थेने जे प्रेम दिले, सहकार्य केले त्या बद्दल या संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांना आपल्या भावना अनावर झाल्या. त्यामुळे संपूर्ण वातावरण भावनिक बनले.या प्रसंगी त्यांनी या संस्थेच्या उत्कर्षासाठी माझी जेथे गरज असेल तेथे मी कधीही तयार असेल अशी भावना बोलून दाखवली.तसेच विद्यालयातील निदेशक श्री पांडुरंग काकडे हेही नियत वयोमानुसार सेवानिवृत्त झाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. जब्बार पठाण यांनी केले तर सूत्रसंचालन सुनिल कटारिया यांनी करून आभार सुधाकर सातपुते मानले.
Tags :
215642
10





