सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पाथर्डीत उत्स्फूर्त प्रतिसाद
नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग
प्रशासनाकडून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
पाथर्डी प्रतिनिधी:
स्व. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पाथर्डी शहर आणि तालुक्यात शनिवारी स्वयंप्रेरित बंद पाळण्यात आला.नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत एकजूट दाखवली.
यार रॅलीमध्ये राहुल राजळे, विष्णुपंत अकोलकर, बंडू बोरुडे, अंकुश कासुळे, महेश बोरुडे, बबन सबलस, सुभाष केकान, राम लाड, परमेश्वर टकले, सचिन वायकर, रामदास बर्डे, दादा डांगे, सोमनाथ माने, उद्धव माने, पप्पू कांजवणे, सोमनाथ आकोलकर, बाबा आमटे, लाला शेख, चांद मणियार, बाळासाहेब चितळे, बबलू खोर्दे आदी नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांचा सहभाग होता.
सकाळी ९ वाजता कोरडगाव चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून निषेध रॅली काढण्यात आली."आमच्या राजाला न्याय मिळालाच पाहिजे!", "हत्याऱ्यांना फाशी द्या!", "संघर्ष आमचा सुरूच राहील!" अशा घोषणांनी पाथर्डी शहर दणाणून गेले.हजारोंच्या उपस्थितीत शांततेत ही रॅली पार पडली.
बंददरम्यान सर्व बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये आणि व्यापारी प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून, ग्रामस्थ व विविध सामाजिक संघटनांनी "जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही!" असा निर्धार व्यक्त केला आहे. आरोपींना तातडीने कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांनी लावून धरली आहे.