महाराष्ट्र
मॉडेल स्कूल' उपक्रम राज्य पातळीवर - शिक्षणमंञी दादा भुसे
By Admin
मॉडेल स्कूल' उपक्रम राज्य पातळीवर - शिक्षणमंञी दादा भुसे
नाशिक - प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यात राबविण्यात येत असलेला मॉडेल स्कूल उपक्रम राज्य पातळीवर राबविण्यात येत असल्याचे संकेत राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले. सांगली जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्याकडून याबाबतची माहिती मंत्री भुसे यांनी घेतली.
शिक्षणमंत्री भुसे यांनी मालेगाव परिसरातील शाळांना भेटी दिल्या. या वेळी त्यांनी पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला. प्राथमिक शाळेतील गुणवत्तावाढीसाठी काय करता येईल, याची चर्चा केली असता, त्यांना सांगली जिल्हा परिषदेने मॉडेल स्कूलचा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ याबाबत साताऱ्याचे जिल्हाधिकारी व तत्कालीन सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. यानंतर सांगलीतील शिक्षणाधिकारी गायकवाड यांना बोलावून घेऊन या उपक्रमाची माहिती देण्याची सूचना दिली.
जिल्ह्यात भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता व लोकसहभाग या त्रिसूत्रीवर आधारित मॉडेल स्कूल, माझी शाळा आदर्श शाळा ही संकल्पना काय आहे, तीन टप्प्यांत ४४९ शाळांमध्ये कार्यान्वित करताना शाळा निवड निकष, उद्दिष्टे, कार्यवाही कशा पद्धतीने सुरू आहे, याबरोबरच या अंतर्गत आनंददायी अभ्यासक्रम, इयत्ता १ ते ८ वर्गांसाठी गुणवत्ता शोध चाचणी परीक्षा, जिल्हा परिषदेचे चाचणी प्रश्नसंच, शिक्षकसंवाद उपक्रम, शिक्षक सक्षमीकरणांतर्गत क्रीडा व शैक्षणिक साहित्यनिर्मिती कार्यशाळा आयोजन, पटनोंदणीसाठी जनजागृतीसाठी बॅनर/पोस्टर/जिंगल व गुढीपाडवा पट वाढवा उपक्रम, शैक्षणिक दिनदर्शिका, शैक्षणिक मेळावे, डिजिटल क्लासरूम, त्रयस्थ संस्थेकडून
मूल्यमापन, सायकल बँक, रोबोटिक्स व कोडिंग लॅब, तालुकास्तरावर सायन्स पार्क आणि बालोद्यान, परसबाग, हँडवॉश स्टेशन, क्रीडांगण, स्वागत कमान, सोलर पॅनल, नेट मीटरिंग, संगणक व विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, चला सावली पेरूया, माझ्या गावचा धडा, परिपूर्ण भौतिक सुविधा उपलब्धता इ. सर्व उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. सांगली जिल्हा परिषदेने राबविलेल्या या उपक्रमाची अंमलबजावणी राज्यस्तरावर करण्याचा संकेत या वेळी मंत्री भुसे यांनी दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले
Tags :
73582
10