पाथर्डी व शेवगांव तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकरी व नागरिकांना आर्थिक मदत देण्याची मागणी निवेदन
पाथर्डी- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची शेवगाव-पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिका राजीव राजळे यांनी आज मुंबई येथे भेट घेवून पाथर्डी व शेवगांव तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकरी बांधवांना व सर्वमान्य नागरिकांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली.
मागील आठवडयापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . शेतातील उभे पीक, पाण्यात गेलेली राहती घरे, पुरामुळे खरडून गेलेली शेती, रस्ते, पुल, विद्युत रोहीत्र, विजेचे पोल, विहीरी, विद्युत पंप, वाहून गेलेली पाळीव प्राणी या इतर बाबतीत प्रचंड नुकसान झाले आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या जीवित व वित्तीय हानी मोठी असून शेतकऱ्यांना व पूरग्रस्थांना नुकसान भरपाई मिळावी या बाबतीत सविस्तर चर्चा केली व तातडीने नुकसान भरपाई मिळणेकामी मा. मुख्यमंत्री महोदय यांना निवेदन दिले.
यावेळी मा.मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याबाबत आश्वासित केले.
भाजपा महायुती सरकार नेहमीच शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आले असून या संकटकाळात देखील ते शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील.
मा.मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले.