अहमदनगर जिल्हातील 'या' बॕकेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला इतक्या रुपयाची मदत
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 05 मे 2021
शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ कोटी रूपयांची मदत दिली. राज्यातील कोरोना व्यवस्थापनासाठी सरकार करत असलेल्या कामाला बँकेनेही या माध्यमातून हातभार लावला आहे.
बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, उपाध्यक्ष माधवराव कानवडे व संचालक मंडळाच्या उपस्थितीत एक कोटी रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मा.आ.चंद्रशेखर घुले पाटील,राज्यमंत्री.ना. विश्वजीत कदम ना.प्राजक्तदादा तनपुरे,यावेळी उपस्थित होते.