आंनदराव पाटील सर यांचा विद्यालयात सेवापुर्ती सत्कार सन्मान
नाशिक न्यूज नेटवर्क - इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा येथील वरीष्ठ लिपीक (भाऊसाहेब) श्री.आंनदराव पाटील सर
यांचा शासकीय सेवेतील ३८ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतुन आज ते सेवानिवृत्त झाले आहे.
त्यांचा विद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ शाल श्रीफळ सत्कार सन्मान करण्यात आला.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी विद्यालयातील शिक्षकांनी पाटील सर यांच्या विषयी मत व्यक्त केले.तसेच पाटील सर यांनी आपल्या शासकीय सेवेतील आलेले अनुभव व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.शेख सर यांनी आपले विचार व्यक्त केले.यावेळी सेवा निवृत्त झाल्याबद्दल विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले.