सिन्नर न्युज नेटवर्क- नगर सिटीझन live24
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा विद्यालयात १५ आॕगस्ट स्वातंत्र्य दिन सोहळा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.यावेळी ध्वजारोहण भारतीय सैन्यदलातील मेजर मुकेश पांडुरंग रोंगटे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गावातून प्रभाथाफेरी काढून विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या. वंदे मातरम,राष्टध्वज सलामी देत राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत,ध्वजगीत,विद्यार्थी संगीतमय कवायत शिस्तबद्ध पद्धतीने झाले.यावेळी कार्यक्रमासाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश निसरड, तालुका अध्यक्ष हनुमंता निसरड,पोलिस पाटील प्रकाश रोंगटे,सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराजे फोकणे,ज्येष्ठ नागरिक किसन दादा रोंगटे, कोंडाजी तात्या भोईर,मुख्याध्यापक- प्राचार्य बी.एस.पवार,भाऊसाहेब खातळे,तानाजी शिंगाडे,पांडुरंग निसरड,भोरु रोंगटे तसेच ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी,अंगणवाडी सेविका व मदतणीस,आरोग्य सेविका,प्राथमिक आरोग्य कर्मचारी,माजी विद्यार्थी,समाजसेवक,ज्येष्ठ नागरिक,वैद्यकीय कर्मचारी परीसरातील पालक तसेच पञकार बंधू,छायाचिञकार तसेच विद्यार्थी व विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षिका उपस्थित होते.