तिसगाव गटाने सामाजिक बांधिलकी जपली; कोविड सेंटरला 50 बेड- मा.आ शिवाजी कर्डीले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 26 एप्रिल 2021
पाथर्डी तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तिसगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्य संध्या आठरे व पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी यांनी तिसगाव येथील कोविड सेंटरला 50 बेड देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली, असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले.
तिसगाव येथील कोविड केअर सेंटरला जिल्हा परिषद सदस्या आठरे व पंचायत समिती सदस्य परदेशी यांनी 50 बेड दिले. त्याचे लोकार्पण कर्डिले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. बाळासाहेब लवांडे, बंडू पाठक, डॉ. अर्चना लांडे, डॉ. हरिभाऊ होडशीळ, विजय अकोलकर, अनिल कराड, प्रवीण तुपे, मीनिनाथ शिंदे उपस्थित होते.