तुरीला ७८००, तर हरभऱ्याला ५४०० रुपये सरासरी भाव
गव्हाची सर्वाधिक ३७२ क्विंटल आवक, भाव २४०० रुपये
अहिल्यानगरः अहिल्यानगर
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारपेठेत शेतमालाची मोठी उलाढाल पाहायला मिळाली. बाजारात नुसार पिकांची आवक समाधानकारक असून काही प्रमुख शेतमालाला चांगला दर मिळाला आहे.
बाजारपेठेत आज तुरीची आवक ९६ क्विंटल झाली असून, त्याला किमान ६५०० रुपये, तर कमाल ७८०० रुपये दर मिळाला. तुरीचा सरासरी भाव १५० रुपये प्रतिक्विंटल राहिला. नर हरभऱ्याला किमान ४८०० आणि कमाल ५४०० रुपयांचा दर मिळाला
असून, हरभऱ्याला सरासरी ५१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आजच्या बाजारात गव्हाची सर्वाधिक म्हणजेच तब्बल ३७२ क्विंटल आवक झाली. गव्हाला २१०० ते २४०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला असून सरासरी दर २२५० रुपये प्रतिक्विंटल राहिला. चिंच
प्रमुख शेतमालाचे सरासरी दर असे
ज्वारीची ११० क्विंटल आवक झाली. ज्वारीला सरासरी २८५० रुपये भाव मिळाला. बाजरीची ५२ क्विंटल आवक झाली, तिला सरासरी २१५० रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला. मूग (आवक २२ क्विंटल): ६५०० रुपये प्रतिक्विंटल दर, उडीद (१८ क्विंटल) : ५२५० रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला. मका (आवक ६६ क्विंटल) : १८५० रुपये सरासरी प्रतिक्विंटलला दर मिळाला.
आणि चिंचोक्याच्या बाजारातही चांगली तेजी पाहायला मिळाली. चिंचेला कमाल १०,००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचा उच्चांकी दर मिळाला असून त्याची ४९० क्विंटल आवक झाली. आज दिवसभरात बाजारात एकूण १५९४ क्विंटल भुसार मालाची आवक झाली.
बाजार समितीच्या यार्डवर शासनाच्या हमीभावापेक्षा कमी दराने विक्री झालेला शेतमाल हा डागी, जास्त आर्द्रता (ओलावा) असलेला किंवा कमी प्रतीचा असल्याने त्याला कमी भाव मिळाल्याचे बाजार समिती प्रशासनाने स्पष्ट केले.