कवडदरा विद्यालयात तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत तालुका प्रथम विजेता संघाचा सत्कार सन्मान
नगर सिटीझन live न्यूज नेटवर्क
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा विद्यालयात तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेता विद्यार्थी खेळाडू संघाचा अनुक्रमे मुले १४ वर्ष व १७ वर्ष वयोगट तसेच मुली व्दितीय क्रमांक १७ वर्ष वयोगट तसेच विजयी संघाचे मार्गदर्शक शिक्षक अमोल म्हस्के यांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार सन्मान विद्यालयाचे प्राचार्य-मुख्याध्यापक बी.एस.पवार तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केला.यावेळी विद्यालयातील शिक्षक एन.एस.पवार,जी.जे.जाधव,डी.व्हि.चव्हाण,एस.एस.लोहार,पी.ई.परदेशी,व्ही.व्हि.गजघाट,व्हि.आर.भांगे,डी.आर.चव्हाण,एस.डी.जाधव,
शरद झनकर,एन.एस.जाधव,संतोष तांबे,सी.एम.जाधव,ए.बी.भोगीर महिला शिक्षिका सौ.सुलोचना भोईर, सौ.करीश्मा मुल्ला,सौ.ज्योत्सना वाकचौरे,सो.पुष्पा पावडे,सौ.सुजाता तुपे,सौ.किर्ती भालेराव तसेच शिक्षकेतर कर्मचारी वरीष्ठ लिपीक पी.एन.कदम,किरण कासार तसेच विद्यालयातील विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.विद्यार्थी खेळाडूचे भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नलगे व सचिव प्रकाश जाधव तसेच संस्था संचालक मंडळ तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्य,माता-पालक संघ,माजी विद्यार्थी,माजी शिक्षक,मुख्याध्यापक विद्यार्थी,शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना पुढील जिल्हास्तरीय स्पर्धासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच विद्यालयातील शिक्षक संतोष तांबे यांनी विद्यार्थी खेळाडूंना स्पोर्ट ड्रेस देणार असल्याचे सांगितले.