सिन्नर नगर सिटीन्यूज - इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा विद्यालयात आदिवासी व क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी गावातून शालेय विद्यार्थ्यांची प्रभाफेरी काढून क्रांतीकारकाच्या नावाचा जयघोष केला.विद्यार्थी क्रांतीकारकांच्या वेशभुषेत आलेले होते.
यावेळी गावातील हनुमान मंदिर येथे आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन आरती घेण्यात आली.
यानंतर विद्यालयात क्रांतीकारकांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.तसेच विद्यालयाच्या परीसरात वृक्षारोपण आलेल्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजपचे इगतपुरी तालुका अध्यक्ष व शालेय समिती सदस्य हनुमंता निसरड, पोलिस पाटील प्रकाश रोंगटे, शालेय समितीचे सदस्य उत्तम बिन्नर,पोलिस पाटील प्रकाश रोंगटे, संपतभाऊ रोंगटे
मुख्याध्यापक- प्राचार्य बी.एस.पवार,अनिल निसरड,
गणेश रोंगटे,रघुनाथ वाकचौरे तसेच जि.प.प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तसेच विद्यार्थी व पालक तसेच ग्रामस्थ माजी विद्यार्थी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.