अहमदनगर जिल्ह्यातील आजच्या महत्त्वाचा ठळक बातम्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 22 मे 2021,शनिवार
अहमदनगर शहरातील लसीकरण माेहीम दाेन दिवस बंद राहणार; लस साठा संपल्यानं निर्णय घेतल्याची आयुक्त शंकर गाेरे यांची माहिती
शिर्डीतील मुख्य पालखी राेड तातडीनं दुरुस्त करा; भाजपचे शहराध्यक्ष सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचं मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
काेराेना उपचारानंतर रुग्णालयातून 3 हजार 419 जणांना रुग्णालयातून घरी साेडलं; जिल्ह्यात रुग्ण बरे हाेण्याचं प्रमाण सुमारे 90 टक्क्यांवर
जामखेडमधील जनता कर्फ्यू संपताच 31 मे पर्यंत निर्बंध लागू; जीवनाश्यक वस्तूंची दुकाने सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंतच खुली ठेवता येणार
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 36 तासांत 2 हजार 492 जणांना काेराेना संसर्गाचं निदान; संगमनेर तालुक्यात सर्वाधिक 294 जणांना काेराेना संसर्ग
प्रहार जनशक्तीकडून केंद्र सरकारचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर थाळीनाद; कडधान्याची आयात व खतांची दरवाढ थांबविण्याची मागणी
कुकडी प्रकल्पातील आडगाव धरणातून 521 क्युसेक वेगानं पाणी साेडण्यात आलं; पारनेर, श्रीगाेंदे, कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा हाेणार
मालमत्ता गुन्ह्यात कुप्रसिद्ध असलेल्या नयन तांदळे टाेळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई; टाेळीतील सहापैकी चार जणांना अटक
राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त युवक काॅंग्रेसतर्फे संगमनेरमधील काेविड सेंटरला 101 वाफेच्या मशिन्सची भेट
काेराेना उपचारादरम्यान काल 75 रुग्णांच्या मृत्यूची नाेंद; जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 650 जणांचा मृत्यू