बाबूजी आव्हाड महाविद्यालय आणि उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण शिबिर
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी येथील बाबूजी आव्हाड महाविद्यालय आणि उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कोवीड-१९ लसीकरण शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेअंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना विभागाने यासाठी पुढाकार घेतला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार अविनाश मंत्री उपस्थित होते. त्यांनी लसीकरण शिबिरास शुभेच्छा दिल्या व प्रतिकूल परिस्थितीत समाजसेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी अध्यक्षीय भाषणात या लसीकरण मोहिमेसाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. सारिका विधाते व त्यांच्या सर्व सहकारी टीमचे तसेच नगरपालिका कर्मचारी शिवाजी पवार व रशीद शेख यांचे सहकार्याबद्दल कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जी.पी. ढाकणे यांनी केले. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. या लसिकरण शिबिरामध्ये ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित फिट इंडिया मोहिमेत यशस्वी सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दत्तप्रसाद पालवे यांनी केले तर आभार डॉ. अरुण राख यांनी मानले.
यावेळी डॉ. बबन चौरे, डॉ. सुभाष शेकडे, डॉ. अर्जुन केरकळ, प्रा. आनंद घोंगडे, प्रा. वैशाली आहेर उपस्थित होते.