नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
चार गावठी पिस्तूल व 12 जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी घेऊन आलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. किशोर बाळासाहेब खामकर (वय 32 रा. राजुरी ता. राहाता), किशोर साईनाथ शिणगारे (वय 28 रा. गोमळवाडी ता. नेवासा), अभय अशोक काळे (वय 24 रा. शिरसगाव ता. नेवासा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. विवेक लक्ष्मण शिंदे (रा. टाकळीभान ता. श्रीरामपूर) हा पसार झाला आहे. दरम्यान हे सर्व गावठी पिस्तूल सराईत गुन्हेगार सागर रोहिदास मोहिते (रा. शिरसगाव ता. नेवासा) याच्याकडून घेतल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. मोहिते पसार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली.