पाथर्डी तालुक्यातील 'या' गावात रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी : राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली असून ही दूर करावी, या प्रमुख मागणीसाठी कल्याण- विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर फुंदे टाकळी येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पालवे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आले
हा रस्ता फुंदेटाकळी पासून मेहकरीपर्यंत अत्यंत खराब झालेला असून अनेक लोकांना या ठिकाणी आपला जीव गमवावा लागला आहे. पाऊस आल्यानंतर रस्त्याला खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यामुळे प्रवास करण्यासाठी खूप त्रास होत आहे. प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पालवे यांनी हे आंदोलन केले. यावेळी अधिकारी व ठेकेदार यांनी कामाला सुरुवात करुन रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेऊ, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.