महाराष्ट्र
637
10
पाथर्डी, अकोले, कर्जत, जामखेड वगळून प्रत्येक तालुक्यात वाढणार एक गट आणि दोन गण
By Admin
पाथर्डी, अकोले, कर्जत, जामखेड वगळून प्रत्येक तालुक्यात वाढणार एक गट आणि दोन गण
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
झेडपी गटासाठी 42 हजार 407 लोकसंख्येची बेस लाईन
अहमदनगर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट आणि गणाची नव्याने रचना करण्याच्या आदेशावर राज्यपालांची सही झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूका होणार्या जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांना कच्ची प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानूसार नगर जिल्ह्यात कार्यवाही सुरू झाली असून जिल्ह्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या भागिले 85 गट हे काढल्यानंतर समोर येणार्या लोकसंख्येला बेस लाईन गृहीत धरून गट आणि गणाची रचना करण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यात 42 हजार 407 ही लोकसंख्या बेस लाईन असून त्यानूसार गटांची रचना करण्यात येणार आहे.
*दरम्यान, लोकसंख्या कमी असल्याने जिल्ह्यातील अकोले, पाथर्डी, कर्जत आणि जामखेड तालुक्यात नव्याने एकही जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीचे गण नव्याने तयार होणार नाहीत.*
याठिकाणी विद्यमान स्थितीतील गट आणि गणांची संख्या आणि भौगोलिक आकार हा कायम राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सुत्रांनी दिली. राज्य सरकारने डिसेंबर 2021 मध्ये 2011 च्या लोकसंख्येनूसार नव्याने गट आणि गणांची रचना करण्याचा निर्णय विधीमंडळात घेतला. या निर्णयावर 31 जानेवारी 2022 राज्यापालांची सही झाल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर झाले. या कायद्यानूसार राज्यातील जिल्हा परिषदेत कमीत 55 तर जास्ती जास्त 85 जिल्हा परिषद गट आणि यांच्या दुप्पट पंचायत समिती गणांची निर्मिती होणार आहे.
नगर जिल्ह्यात 2011 च्या ग्रामीण लोकसंख्येच्या प्रमाणात 85 जिल्हा परिषर गट आणि 170 गण होणार आहेत. नगर जिल्ह्याची ग्रामीणची लोकसंख्या 36 लाख 4 हजार 668 असून या लोकसंख्येला 85 ने भागाल्यानंतर 42 हजार 407 ही लोकसंख्या बेसलाईन ठरत आहे. या बेसलाईन लोकसंख्येत 10 टक्के वाढ अथवा 10 टक्के घट होण्याची शक्यता गृहीत धरून नव्याने गट आणि गणांची रचना करण्यात येणार आहे. यामुळे एखाद्या गटाची अधिकाअधिक लोकसंख्याही 46 हजार 427 राहणार असून एखाद्या गटाची कमीत कमी लोकसंख्याही 38 हजार 167 असू शकणार आहे. जिल्ह्यात नव्याने होणार्या गट आणि गणांची रचना ही झीकझ्याक पध्दतीने होणार असल्याने बदल होणार्या तालुक्यातील जुन्या गटातील गावे जुन्या गटातून नव्या गटात जाण्याची शक्यता आहे. लोकसंख्या ही नवीन गट आणि गण रचनेचा बेस असल्याने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इखच्छुक असणार्यांच्या पोटाता आतापासून गोळा येणार आहे.
तयार होणारी कच्ची गट आणि गणांची रचना ही जिल्हा प्रशासनामार्फत राज्य निवडणूक आयोगाला आधी मेलवर आणि त्यानंतर सादर करण्यात येणार आहे. काही वर्षापूर्वी अशा प्रकारे कच्ची गट-गण रचना तयार करून ती राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येत होती. त्यानंतर या प्रक्रियेला विभागीय आयुक्त स्तरावर मान्यता देण्यात येत होती. आता पुन्हा राज्य निवडणूक आयोग या कच्च गट-गण रचना अंतिम करणार असून त्यानंतर ती विभागीय आयुक्तांच्या सहिने अंतिम होणार आहे.
असे आहेत संभाव्य गट
अकोले 6, संगमनेर 10, कोपरगाव 6, राहाता 6, श्रीरामपूर 5, नेवासा 8, शेवगाव 5, पाथर्डी 5, श्रीगोंदा 7, जामखेड 3, कर्जत 5, पारनेर 6, राहुरी 6, नगर 7 असे 85 गट तर प्रत्येक तालुक्यात गटाच्या दुप्पट गण म्हणून 170 गण तयार होणार आहेत.
झिकझॅक पध्दतीत दक्षिण बाजूला तयार होणार गट
जिल्हाधिकार्यांकडून तहसीलदारांना प्रभागांचा कच्चा आराखडा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या गटांची लोकसंख्याही 50 हजारांच्या जवळपास आहे. त्यातून साधारणपणे 6 ते 8 हजार लोकसंख्या कमी होणार आहे. ही लोकसंख्या उत्तरेकडून पूर्वेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे, पश्चिमेकडून दक्षिणेकडे अशी झिकझॅक (झेड) पद्धतीने सरकून दक्षिण बाजूला नवीन गट तयार होईल. त्यात लोकसंख्येनुसार जे मोठे गाव असेल त्या गावाचे नाव गटाला दिले जाणार आहे.
Tags :

