पाथर्डी- नगरपालिकेच्या लेखी आश्वासनानंतर शिवसेनेचे उपोषण मागे
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील हंडाळवाडी या नगरपालिका क्षेत्रातील विविध समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब धस यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २७ सप्टेंबर पासून सुरू असलेले बेमुदत उपोषण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्या वतीने आस्थपणा लिपिक किशोर पारखे यांनी दिवाळीपूर्वी सर्व कामे मार्गी लावू, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
माजी शिवसेना शहरप्रमुख यांनी हंडाळवाडी येथे दुधसंघ ते हंडाळवाडी स्टेट लाईट रस्ता दुरुस्ती, हंडाळवाडी ते भापकर वस्ती रस्ता काँक्रटीकरण, धसवस्ती ते मोहरी रोड रस्ता काँक्रटीकरण आदी मागण्यांच्या संदर्भात २७ सप्टेंबर पासून उपोषणाला सुरुवात केली होती. या उपोषणाला माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण हंडाळ , श्रीधर हंडाळ , काशिनाथ भिसे , रावसाहेब हंडाळ , राजेंद्र उराडे , काकासाहेब कराळे , अशोक भापकर ,बापू हंडाळ , दत्तु उराडे , म्हतारदेव वारकड आदी गावकरी बसलेले होते. सदर उपोषणाला शिवसेना तालुकाप्रमुख अंकुश चितळे , शहरप्रमुख सागर राठोड , युवासेना शहरप्रमुख सचिन नागापुरे , शिक्षक सेना तालुकाप्रमुख नंदकुमार डाळिंबकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.
दरम्यान नगरपालिकेच्या लेखी आश्वासनानंतर सदरील आमरण उपोषण स्थगित करण्यात आले.
माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, माजी पंचायत समिती सदस्य शिवसेना नेते विष्णुपंत पवार, युवा सेनेचे दत्तात्रय दराडे, युवा सेना शहर प्रमुख सचिन नागापुरे यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन उपोषण स्थगित करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते लक्ष्मण हंडाळ, विष्णुपंत पवार,रावसाहेब हंडाळ, दत्ता दराडे, राजेन्द्र उराडे, अशोक हंडाळ, काशीनाथ भिसे,सचीन नागापुरे, सुरेश हुलचुते, विकास दीनकर, पांडुरंग हंडाळ, नगरपालिका कर्मचारी अंबादास साठे, किशोर पारखे ,दसरथ हंडाळ , सर्व गावकरी व पदाधिकारी उपस्थित होते .