पाथर्डी तालुक्यातील 'या' ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभारामुळे बैठा सत्याग्रह करीत आंदोलन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील मोहज बुद्रुक ग्रामपंचायतीने येथील सतीश फसले, सुरेश जाधव यांच्या कामाचे बिले काढून पैशाचा अपहार केला आहे, याची चौकशी करून खऱ्या काम करणाऱ्या लोकांचे पैसे मिळावे, याप्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंचायत समितीमध्ये बैठा सत्याग्रह करून आंदोलन सुरु केले आहे.
मोहज ब्रुद्रुक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व माजी सरपंच यांनी संगमत करून कामाचे बिल काढले व सरकारी पैशाचा अपहार केल्याचा आरोप पाथर्डी तालुका वंचित बहुजन आघाडीने केला आहे. सतीश फसले, सुरेश जाधव यांनी ग्रामपंचायती मार्फत मागासवर्गीय निधीतून रस्ताचे काम केले. मात्र दुसऱ्याच ठेकेदार व्यक्तीची कागदपत्रे जोडून बिले काढून पैसे हडप केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. राज्याचे उपाध्यक्ष किसन चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, तालुकाध्यक्ष भोरू म्हस्के, प्यारेलाल शेख, सुरेश जाधव, सतीश फसले, सुनीता जाधव, रोहिणी ठोंबे, अमोल मिरपगार, काळू मिरपगार, लक्ष्मण मोरे, अशोक दहातोंडे आदी कार्यकर्ते आंदोलन प्रसंगी उपस्थित होते.