महाराष्ट्र
विकासकामांसाठी प्रयत्नशील राहू- अर्जूनराव शिरसाट
By Admin
विकासकामांसाठी प्रयत्नशील राहू- अर्जूनराव शिरसाट
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यात झालेल्या महापुर व पावसामुळे अनेक रस्ते वाहून गेले आहेत. पुढील काळात शासनाच्या पूरहानी निधी योजनेतून टाकळीमनुर गटातील विविध पुलांचे व रस्त्याचे कामे करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन माजी समाजकल्याण सभापती अर्जुनराव शिरसाट यांनी केले.
पाथर्डी तालुक्यातील भिलवडे येथील भिलवडे ते टाकळीमानुर पंधरा लक्ष रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचे तसेच पंधरा लक्ष रुपये खर्चाच्या स्मशानभूमी बांधकामाचे भूमिपूजन शिरसाट यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ह. भ. प. अद्वैतानंद सरस्वती महाराज, ह. भ. प. गरीबदास महाराज , सरपंच सुरेश बडे , उपसरपंच अमोल बडे , ग्रामपंचायत सदस्य सुभाष बडे , कल्याण नागरगोजे ,शिवाजी बडे , संजय मोरे ,शिवसेनेचे शेवगाव- पाथर्डी मतदारसंघाचे संघटक भगवानराव दराडे , धर्मराज बडे, पांडुरंग बडे लक्ष्मण बडे, महादेव बडे , चेअरमन बाबुराव बडे, अण्णासाहेब बडे ,जनार्दन बडे दगडू बडे ,विठ्ठल मिस्तरी , भाऊसाहेब बडे , रमेश बडे , विष्णू बारगजे , मिठू बडे , कैलास बडे, पद्मनाथ बडे, सतीश बडे , सुनील बडे ,रणजीत बडे , कल्याण बडे , ज्ञानेश्वर बडे , कोडीआन्ना
बडे ,विश्वास सोनवणे , शहादेव बडे ,पोपटराव बडे , बाबुराव खंडागळे , सर्जेराव बडे ,बंटी बडे आदी सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढे बोलतांना शिरसाट म्हणाले, कोरोनाच्या महाभयंकर साथ रोगामुळे मागील दोन वर्षापासून शासनाने कोणत्याही विकास कामाला निधी न देता हा सर्व निधी कोरोना रुग्णांसाठी वळवला, मात्र आता परिस्थिती सुधारत चालल्यामुळे निधी मिळण्याची शक्यता आहे .आपण त्यासाठी प्रयत्नशील आहोत. शहरी भागात अंत्यविधीसाठी व्यवस्था असते. ग्रामीण भागात याचा अभाव असतो. अंत्यविधीसाठी चांगली व्यवस्था असावी, यासाठी गावाने प्रयत्न केले पाहिजे . भिलवडे गावात अनेक दिवसांपासून स्मशानभूमीची सोय नव्हती, मात्र जिल्हा परिषदेतून निधी दिल्यामुळे आता ही गैरसोय दूर होणार आहे. ज्यांनी या स्मशानभूमीसाठी आपली जमीन दिली त्यांचे मी आभार मानतो . त्याच ठिकाणी नागरिकांनी दशक्रियाविधी साठी घाट बांधून गावात एकाच ठिकाणी दशक्रिया विधी करण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे शिरसाट म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच सुरेश बडे यांनी केले तर दत्तात्रय दराडे यांनी सर्वांचे आभार मानले.
Tags :
62134
10