विम्याच्या 37 कोटीच्या पैशासाठी मनोरुग्णांचा खून
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
विम्याचे 37 कोटी रुपये मिळवण्यासाठी चक्क एका मनोरुग्णाची हत्या करून स्वतःचा मृत्यू दखवण्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील अकाेले तालुक्यात उघडकीस आला आहे. अकोले तालुक्यातील राजूर पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला असून मुख्य आरोपी सह पाच जणांना अटक केली आहे. पाेलिस अधीक्षक मनाेज पाटील यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.
अहमदनगरच्या अकोले तालुक्यातल्या राजूरमधील धामणगाव पाट या गावातील एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मागील वीस वर्षापासून अमेरिकेत स्वयंपाकीची नोकरी करणाऱ्या प्रभाकर वाकचौरे यांनी 2013 साली बायकोचा 10 लाख डॉलरचा आणि स्वतःचा 50 लाख डॉलरचा अमेरिकेत ऑल स्टेट इन्शुरन्स कंपनीकडे इन्शुरन्स काढला. इन्शुरन्सचा क्लेम मिळाव्यासाठी प्रभाकर आपल्या गावी आला. आपल्या चार साथीदाराच्या मदतीने चार महिने नियोजन करून करून कट रचला. एका मनोरुग्न व्यक्तीचा विषारी सापाच्या दंशाने खून करून स्वतःचा मृत्यू झाल्याचे पुरावे तयार केले. हे पुरावे आणि कागदपत्र वाकचौरे याने विमा कंपनीकडे सादर केले. मात्र याची पडताळणी करताना या प्रकरणात काहीतरी गडबड असल्याचा संशय विमा कंपनीला आल्याने त्यांनी राजूर पोलिसांची मदत घेतली. राजूर पोलिसांनी तपास केला. त्यावेळी प्रभाकर वाकचौरे जिवंत असल्याचे समोर आले.
पोलिसांनी प्रभाकरला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर प्रभाकर आणि त्याच्या चार साथीदारांनी नवनाथ अनप या मनोरुग्णाची विषारी सापांच्या दंशाने हत्या केल्याची माहिती दिली. घडलेला सर्व धक्कादायक प्रकार समोर आला.