पारनेर तालुक्यात आमदार निलेश लंकेंचीच पाॅवर नगरपंचायतवर राष्ट्रवादीचा झेंडा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पारनेर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय सदाशिव औटी व उपनगराध्यक्षपदी सहयोगी सदस्या सुरेखा अर्जुन भालेकर यांची बहुमताने निवड झाली.त्यांनी शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नवनाथ सोबले व उपनगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या गंधाडे यांचा पराभव केला.नगरपंचायतमधे त्रिशंकु अवस्था असतानाही आमदार निलेश लंके यांनी हा जादुई आकडा गाठला व नगरपंचायत ताब्यात घेत, नगरपंचायत वर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला.आज बुधवार दि.१७ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता हात उंचावुन मतदान प्रक्रिया राबविण्यात आली.भाजपाचे अशोक चेडे यांनीही राष्ट्रवादीला मदत केली.राष्ट्रवादीला नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी १० मते तर शिवसेनेला ६ मते मिळाली.यामधे राष्ट्रवादीचा बहुमताने विजय झाला.आमदार निलेश लंके, नवनिर्वाचित नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष सुरेखा भालेकर व सर्व नगरसेवकांची जेसीबीच्या साह्याने भंडार्याची उधळण करत भव्य मिरवणुक काढण्यात आली होती.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन सुधाकर भोसले यांनी तर सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन काम पाहीले.
१)नगरपंचायतवर राष्ट्रवादीचा झेंडा..
२)पारनेरमधे आमदार लंकेंचीच पाॅवर...
३)नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे विजय औटी तर उपनगराध्यक्षपदी सुरेखा भालेकर यांची निवड