महाराष्ट्र
5077
10
कोव्हिड - 19 मुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना ५० हजार सानुग्रह अनुदान
By Admin
कोव्हिड - 19 मुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना ५० हजार सानुग्रह अनुदान
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हयातील नागरिकांना कळविणेत येते की,
मा. प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन यांचेकडील अ.शा.पत्र दि. 12/10/2021 व मा.अपर मुख्य सचिव,सार्वजनिक आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र दि.13/10/2021अन्वये कळविले आहे की, मा.सर्वोच्च न्यायालयाकडील रिट याचिका (सिव्हील) क्र.539/2021 मधील दि.30/06/2021 व दि.04/10/2021 रोजीचे आदेशानुसार व त्याअनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाव्दारे निर्गमित दि. 11/09/2021 चे मार्गदर्शक सूचनानुसार कोव्हीड 19 ने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना रक्कम रु.50,000/- सानुग्रह मदत देण्याचे राज्यांना सूचित केलेले आहे. तसेच मदत व पुनर्वसन विभाग,महाराष्ट्र शासन यांचेव्दारे सानुग्रह मदत वितरणाबाबतचा ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा सविस्तर तपशिल सूचित करण्यात येईल असे कळविले आहे.
अहमदनगर जिल्हयातील कोव्हिड 19 ने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना रक्कम रु.50,000/- इतकी सानुग्रह मदत वाटपासाठी सक्षम प्राधिकरण व प्राधिकरणाचा पत्ता खालीलप्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अहमदनगर
पत्ता - आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन शाखा, नियोजन भवन,जिल्हाधिकारी कार्यालय,अहमदनगर
संपर्क क्र. - 0241 - 2323844, 2356940, (टोल फ्री क्रं.1077)
ईमेल - ddmaahmednagar@gmail.com
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष जिल्हाधिकारी अहमदनगर हे आहेत. मदत व पुनर्वसन विभाग,महाराष्ट्र शासन यांचेव्दारे अर्ज सादर करण्याबाबतची ऑनलाईन कार्यपध्दती (अर्ज करण्याचे ठिकाण,विहित नमुना इ.) लवकरच अधिसूचित करण्यात येईल. त्याबाबतच्या सूचना प्राप्त होताच स्वतंत्रपणे कळविणेत येईल.
(डॉ.राजेन्द्र ब. भोसले)
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगर
Tags :

