Breaking- 'या' नगरपंचायतमध्ये महिलाराज अन् 'या' एकहाती सत्ता मिळवली
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी आज निवडणूक झाली. यामध्ये अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उषा अक्षय राऊत यांचा एकमेव उमेदवारी अर्ज भरण्यात आला होता.
तर उपनगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षाच्या रोहिणी सचिन घुले यांचा एकमेव उमेदवारी अर्ज भरला होता. कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदी उषा अक्षय राऊत तर उपनगराध्यक्षपदी रोहिणी सचिन घुले यांची निवड झाली. या दोघींचीही निवड बिनविरोध झाली आहे.
आमदार रोहित पवार यांनी कर्जत नगरपंचायतमध्ये एकहाती सत्ता मिळवली आहे. 17 पैकी 15 जागा राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीने जिंकले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 12 तर काँग्रेसला तीन जागा मिळाल्या आहेत. सत्तेचे वाटप करताना आमदार रोहित पवार यांनी काँग्रेस पक्षाला देखील सहभागी करून घेत उपाध्यक्षपद दिले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांत अधिकारी अजित थोरबोले यांनी काम पाहिले. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवडणुकीनंतर कर्जत मध्ये सर्व नगरसेवकांची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये आमदार रोहित पवार हे देखील सहभागी झाले होते.