महाराष्ट्र
16160
10
पेपरफुटीचे रॅकेट, भ्रष्टाचारामुळे राज्यभर चर्चा..!
By Admin
पेपरफुटीचे रॅकेट, भ्रष्टाचारामुळे राज्यभर चर्चा..!
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कोरोनामुळे विस्कळित झालेल्या शैक्षणिक क्षेत्राचे वेळापत्रक यंदाच्या वर्षात सुरळीत झाल्याने लाखो विद्यार्थी, पालकांना दिलासा मिळाला आहे. सीईटी परीक्षा वेळेवर पार पडण्यापासून वेळीच प्रवेश प्रक्रिया राबविल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे.दुसरीकडे स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रकदेखील पूर्वपदावर येत असताना सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. परंतु यंदाच्या वर्षात तलाठी भरतीसह इतर परीक्षांमधील पेपरफुटीच्या सक्रिय रॅकेटची पाळेमुळे नाशिकला सापडली.शिक्षण विभागातील भ्रष्टाचार अन् अधिकाऱ्यांकडील कोट्यवधींची माया यामुळेदेखील नाशिकची राज्यभर चर्चा झाली.- अरुण मलाणी (Nashik is talk of state due to paper racket corruption nashik recap 2023 news)विविध कारणांनी रखडलेल्या स्पर्धा परीक्षा व सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांकडून मेगा भरतीचे स्वप्न यंदाच्या वर्षी अपूर्णच राहिले. दिलासा तर नाही पण पेपरफुटीच्या घटनांनी उमेदवारांना मनस्ताप नक्कीच वाढविला. ऑगस्टमध्ये घेतलेल्या तलाठी भरतीच्या ऑनलाइन परीक्षेत पहिल्याच दिवशी नाशिक केंद्रावर गैरप्रकार उघडकीस आला होता.म्हसरूळ परिसरातील केंद्राबाहेरून संशयित तरुणाला वॉकी-टॉकी, दोन मोबाईल फोन, टॅब आणि हेडफोनसह पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हे प्रकरण थेट विधिमंडळातही गाजले. या प्रकरणातील संशयित इतरही विविध परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.परंतु आता वर्ष संपत असताना पेपर फुटीचे संपूर्ण प्रकरण थंडावले आहे. राज्यभर विस्तार असलेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षेतही एका विषयाचा पेपर फुटल्याचे आढळून आले. मात्र विद्यापीठाने तातडीच्या उपाययोजना करत पेपर रद्द करून सुधारित तारखेला परीक्षा घेतली.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एमबीए अभ्यासक्रमाचाही एका विषयाचा पेपर फुटल्याने सुधारित तारखेला परीक्षा घेण्याचे विद्यापीठाने जाहीर केले. दरम्यान निलंबित मुख्याध्यापकाला कामावर रुजू करण्यासाठीचे पत्र देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या महापालिका शिक्षण विभागातील प्रशासनाधिकारी सुनीता धनगर व लिपिक नितीन जोशी यांना पन्नास हजार रुपयांची लाच घेताना अटक केले होते.यानंतर चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांकडे आढळून आलेली माया पाहून सर्वांचेच डोळे चक्रावले होते. शिक्षण विभागातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित झाल्याने, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदार्यांवर नियुक्त्या न देण्याबाबत घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नाशिक दौऱ्यावर असताना केली.प्रत्यक्षात मात्र अन्य विविध तक्रारींमध्ये चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्यांच्या विविध पदांवर नियुक्त्या झाल्याने ही घोषणा हवेतच विरल्याचा कटू अनुभव आला. वर्ष सरण्याच्या काही दिवसांपूर्वीच मोठ्या शैक्षणिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांच्यावरील कारवाई चर्चेचा विषय ठरली. दरम्यान शिक्षण विभागातील महत्त्वाच्या पदांवर वर्षभर प्रभारींचेच राज्य राहिल्याचे बघायला मिळाले.
Tags :
16160
10





