पाच वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार अत्याचारप्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाच वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. येथील जिल्हा न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी हा निकाल दिला आहे.
रवींद्र मोहन कोपरगे (रा. इंदिरानगर, ता. शेवगाव) असे शिक्षा ठेवण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
1 जून 2022 रोजी शेवगाव शहरातील इंदिरानगर येथे आरोपी रवींद्र मोहन कोपरगे याने पाच वर्षीय अल्पवयीन मुलीला मोबाईल खेळण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी घेऊन गेला व तिच्यावर अत्याचार केला. घटना उघडकीस आल्यानंतर मुलीच्या आईने शेवगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद व न्यायालयासमोर आलेला पुरावा ग्राह्य धरून आरोपीस न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील मनिषा केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले. पैरवी अधिकारी राणी बोर्डे, हवालदार विजय गावडे, खंडागळे यांनी सहकार्य केले.
नऊ महिन्यांत खटल्याचा निकाल
मुलीचे वय पाहता या घटनेमुळे तिच्या बालमनावर वाईट परिणाम झाला आहे. त्यामुळे आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. न्यायालयाने नऊ महिन्यात आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.