महाराष्ट्र
इंदोरीकर महाराजांच्या सासूबाईंचा डंका, शशिकला पवार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान
By Admin
इंदोरीकर महाराजांच्या सासूबाईंचा डंका, शशिकला पवार ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
किर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या (Indurikar Maharaj) सासूबाई (Mother-in-Law) सरपंचपदी (Sarpanch) विराजमान झाल्या आहेत.
अपक्ष उमेदवारी दाखल करत इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार (Shashikala Shivaji Pawar) निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायत (Nilwande Gram Panchayat) निवडणुकीत झालेल्या दुरंगी लढतीत शशिकला शिवाजी पवार विजयी झाल्या आहेत.
इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई सरपंचपदी विराजमान
शशिकला पवार या समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या सासूबाई (Indurikar Maharaj Mother in Law) आहेत. शशिकला पवार यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सुशीला उत्तम पवार यांच्यावर 227 मतांनी विजय मिळवला आहे. नारळ या चिन्हावर निवडणूक लढवत शशिकला पवार या निळवंडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. अपक्ष उमेदवारी दाखल करत विजय मिळवणाऱ्या शशिकला पवार भाजपला पाठिंबा देणार असल्याचं त्यांच्या समर्थकांकडून सांगितलं जात आहे. मात्र, त्यांनी याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.
राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुक निकालाचा गुलाल
राज्यभरात विविध जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकालाची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. 18 डिसेंबर रोजी पार पडलेल्या निवडणुकीची आज मतमोजणी आहे. सार्वत्रिक निवडणुकीतून थेट सरपंचाची निवड झाली आहे. राज्यातील 7751 ग्रामपंचायतींसाठी रविवारी 18 डिसेंबरला मतदान पार पडलं. आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली असून काही जागांवरील विजयी उमेदवारांची नाव जाहीर झाली आहेत.
संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींचे निकाल
संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींपैकी सातव्या फेरीअखेरपर्यंत 33 ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात गटाने 25 ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे 8 ग्रामपंचायती आल्या आहेत. विखेंनी जोर्वे ग्रामपंचायतीची जागा पटकावून थोरातांना धक्का दिल्यानंतर आता विखेंच्या ताब्यातील निमगाव जाळी ग्रामपंचायत पटकावित थोरातांनी परतफेड केली आहे.
संगमनेर एकुण ग्रामपंचायत - 37
जाहिर निकाल - 33
काँग्रेस - 25
भाजप - 08
Tags :
139054
10