महाराष्ट्र
41574
10
पोलिसांची कारवाई;चांदा येथून २२ गोवंश जनावरांची सुटका
By Admin
पोलिसांची कारवाई;चांदा येथून २२ गोवंश जनावरांची सुटका
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील चांदा येथे सोनई पोलिसांनी छापा टाकून
कत्तलीसाठी आणलेल्या ३ लाख ६३ हजार रुपये किमतीचे
गोवंश जातीची लहान मोठे २२ जनवरांची सुटका केली आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिले वरुन दि. ३ फेब्रुवारी २०२३ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गोपनीय बातमी माहिती मिळाली की, चांदा तालुका नेवासा या गावामध्ये कत्तल करण्यासाठी अवैधरीत्या वाहतुक करुन घेवुन जाण्यासाठी गोवंश जातीची लहान मोठे जनावरे आणलेले आहेत. सदर बातमीची खात्री करून आम्ही सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी स्वतः पुढाकार घेऊन व पोलीस स्टेशनचे पोलीस स्टाफ व पंचांसह बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री करून छापा कारवाई केली. सदर कारवाईमध्ये गोवंश जातीची लहान मोठे असे एकूण २२ जनावरे किंमत अंदाजे ३ लाख ६३ हजार रुपये प्रमाणे मिळून आल्याने सदरची जनावरे ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या अन्नपाणी, निवारा व सुरक्षेसाठी संत जनाबाई गोशाळा, हनुमान टाकळी तालुका पाथर्डी येथे पाठवण्यात आली आहेत.
सदर छापा कारवाईमध्ये बाबू दाऊद शेख (वय ३५ वर्ष), जावेद युसुफ शेख (वय ४४ वर्ष), हातिम शब्बीर पठाण (वय २२ वर्ष) सर्व रा. चांदा,तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर एकूण तीन आरोपी मिळून आले आहेत.
त्यांचेवर सोनई पोलीस ठाणेस गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६/२०२३ महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधीनीयम १९९५ चे कलम ५(अ), ९(अ) सह प्राण्यांचा छळ प्रतीबंध अधीनीयम १९६० चे कलम ३,११ प्रमाणे फिर्यादी पोकॉ सचिन कारभारी ठोंबरे यांचे सरकारतर्फे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार राजेंद्र औटी हे करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अहमदनगर राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक बी. चौधरी, पोलीस उपनिरीक्षक आर.व्ही. थोरात, पोहेकॉ आव्हाड, पोहेकॉ गावडे, पोहेकॉ औटी, पोना झांबरे, पोना थोरात, पोकॉ मोरे, पोकॉ
तमनर आर, पोकॉ तमनर एन, पोकॉ.शित्रे, पोकॉ भांड, पोकॉ ठोंबरे यांनी केली आहे.
Tags :

