जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अॅड. उदय शेळके, माधवराव कानवडे उपाध्यक्ष!
अहमदनगर- प्रतिनिधी
अहमदनगर
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी जीएस महानगर बँकेचे अध्यक्ष अॅड. उदय गुलाबराव शेळके यांची तर उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी शनिवारी (आज) निवड बॕकेच्या मारुतराव घुलेपाटील सभागृहात बैठक झाली आहे
त्यामध्ये ही निवड प्रकिया पार पाडली.बैठकीला सर्व संचालक उपस्थित होते.
या पदासाठी अॅड. शेळके यांचे नाव सुरूवातीपासूनच आघाडीवर होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी सकाळपासूनच यासाठी नगरमध्ये तळ ठोकला होता. यावेळी अध्यक्षपदाची पहिली संधी राष्ट्रवादीला मिळाली असून, उपाध्यक्षपद काँग्रेसकडे गेले आहे. अॅड. शेळके हे राष्ट्रवादीचे आहेत. कानवडे महसूलमंत्री थोरात यांचे कट्टर समर्थक मानले जातात.