सगेसोयरेची तात्काळ अंमलबजावणी करावी.- अंकुशराव डांभे
पाथर्डी- प्रतिनिधी
राज्य सरकार मराठा आरक्षणावर वेळकाढूपणा करत आहे,दरवेळेस वेळ वाढवून मागत आहे,आणि दिलेल्या वेळेत सरकार मराठा आरक्षणावर काहीच करताना दिसत नाही,सगेसोयरे संदर्भात शासनाने जे परिपत्रक काढले आहे त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी मराठा युवा संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव डांभे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ईमेल द्वारे पञ पाठवून केली आहे.सगेसोयरे वर कायदा पारित करण्यासाठी वेळ मागितला,नंतर विधानसभेची अधिवेशन बोलावलं,त्यामध्ये प्रामुख्याने सगेसोयरे संदर्भात शासनाने विषय काढला नाही,यावरून सरकार मराठा समाजाला फसवत आहे हे सिद्ध झाले,सरकारने दहा टक्के समाजाला आरक्षण देऊन आणखी फसवणूक केली आहे कारण बिहार सरकारने जात निहाय जनगणना करून मागासवर्गयांसाठी ६५ टक्के आरक्षण दिले होते.ते न्यायालयाने रद्द केले. महाराष्ट्र सरकारने जात निहाय जनगणना न करता ५० टक्क्यांवर आरक्षण दिलच कसं? मागासवर्गयांसाठी आरक्षण टिकत नाही तर मराठा समाजाचं आरक्षण कसं टिकणार? म्हणून सरकारला विनंती आहे की क्यूरेटिव पीटिशन कोर्टात प्रलंबित आहे.सरकारने त्याचा विचार करून निर्णय घ्यावा, आणि केंद्र सरकार कडे जात निहाय जनगणना करण्यासाठी मागणी करावी,,आणि मराठा समाजाचा विषय गांभीर्याने सोडवावा,अशी मागणीही अंकुशराव डांभे पाटील यांनी मुख्मंत्र्यांकडे केली आहे