महाराष्ट्र
24012
10
चैतन्य कानिफनाथ व मच्छिंद्रनाथांच्या समाधीला जलाभिषेकासाठी लाखो कावडी
By Admin
चैतन्य कानिफनाथ व मच्छिंद्रनाथांच्या समाधीला जलाभिषेकासाठी लाखो कावडी
फुलोरबाग यात्रा मढी व मच्छिंद्रनाथ समाधी सोहळा मायंबा गडावर संपन्न
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथ व मायंबा येथील चैतन्य मच्छिंद्रनाथाच्या संजीवनी समाधीला जल अभिषेकासाठी लाखो कावडी पायी चालत पारंपारिक डफडी, शिंग तुतारी, ढोल वाजवत कानिफनाथ महाराज की जय, गंगामाई की जय, बोल बडे बाबा की जय , हर हर महादेव असा जयघोष करत मढी व मायंबाच्या पायथ्याशी दाखल झाल्या होत्या .
कानिफनाथांचे गुरू जालीदंरनाथ यांनी अनेक वर्षे फकीर वेषात वास्तव्य करत गोदावरी तीरावर तपश्चर्या केली. अशा या सय्यद सादत अली दर्गा येथे मानाचे निशान कावडी यांना मानपान देऊन नाथांच्या आरत्या पुजन करून लाखो भाविक रविवारी पैठणहुन मढी कडे पायी चालत होते. सर्व कावडी आपापल्या नियोजना प्रमाणे गोदावरीतुन पवित्र पाणी मातीच्या घागरीत व कलशात भरुन वाजत गाजत मढी मायंबा कडे आल्या. मढी, निवडुंगे, सावरगाव येथील भाविक मातीच्या घागरीतुन पाणी कावडद्वारे आणून जलाभिषेक करण्याची शेकडो वर्षांपासूनची परंपरा आहे. सुमारे एक लाखाहून अधिक भाविक कावडी घेऊन दोन्ही ठिकाणी पैठणहून गंगेचे पाणी आणतील असा देवस्थान समितीचा अंदाज होता. त्या पद्धतीचे नियोजन करण्यात आले .कानिफनाथ यात्रेचा शेवटचा टप्पा मंगळवार ( ता . २१) रोजी फुलोरबाग यात्रा व मच्छिंद्रनाथ समाधी सोहळा मायंबा गडावरती संपन्न झाला आहे.
मढी व मायंबा येथील यात्रेची सांगता गुढीपाडव्याच्या महा पूजने नाथांच्या समाधीला सुगंधी लेप ( मळी )लावून होते. त्यापूर्वी रात्रभर राज्याच्या विविध भागातून आलेले भाविक पैठणहून पायी चालत अभिषेक करण्यासाठी कावडीने पाणी आणले. पाथर्डी शेवगाव नगर बीड जिल्ह्यातील भाविकांची संख्या मोठी होती. मढीच्या फुलोरबाग यात्रेला प्रारंभ होऊन मानाच्या ध्वजांची व कावडीची वाजत-गाजत मिरवणूक निघाली. मढी देवस्थानचे अध्यक्ष बबन मरकड, उपाध्यक्ष सचिन गवारे, सचिव विमलताई मरकड, शिवजीत डोके, कोषाध्यक्ष भाऊसाहेब मरकड, रवींद्र आरोळे, मच्छिंद्रनाथ देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के, नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाथा मरकड, गोरक्ष मरकड, भाग्येश मरकड, मनोज मरकड, सुरेश मरकड, नवनाथ मरकड, अमोल मरकड भाविक बबन ढवळे, बबन मरकड मढी देवस्थान समितीने पायी कावड घेऊन येणाऱ्या भाविकांना सेवा दिली .
Tags :
24012
10





