महाराष्ट्र
14075
10
मूर्तीचे दागिनेआणि पूजेचे सोन्या चांदीचे साहित्य दान पेट्या सुरक्षित
By Admin
कडक सुरक्षा व्यवस्था सि सि टीव्ही आणि भाविकांचा कायम राबता असलेल्या अमरापूरच्या रेणुकामाता मंदिरात धाडसी चोरी चोरांचे एकच लक्ष मंदीरातील मूर्तीचे दागिनेआणि पूजेचे सोन्या चांदीचे साहित्य दान पेट्या सुरक्षित
शेवगाव- प्रतिनिधी
शेवगांव तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरापूरच्या श्री. क्षेत्र रेणुकामाता देवस्थानातील रेणुका आई साहेबांच्या मूर्तीचा सुमारे 17 लाख रुपये किंमतीचा सोन्या चांदीचा ऐवज चोरीला गेल्याची घटना दिनांक 18 ऑगस्ट शुक्रवारी पहाटेच्या दोन च्या सुमारास घडली आहे.
घटनेची माहिती समजताच जिल्हाभरातून देवी भक्त मोठ्या संख्येने येथे दाखल झाले होते. या प्रकरणी देवस्थानचे पुजारी तुषार वैद्य यांचे फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच, उप विभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, पाथर्डीचे पोनि . संतोष मुटकुळे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन ठसे तज्ञ, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पाचारण केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप आहेर देखील आपल्या पथकासह घटनास्थळी लगेच दाखल झाले. दरम्यान मंदिरात असलेल्या सिसीटीव्हीचे चित्रीकरण पोलिसांनी तपासले असता, त्यात एक चोरटा मूर्तीचा साज काढतांना, तर दुसरा बाहेर उभा असल्याचे आढळून आले. पहाटे दीड वाजण्याच्या सुमाराला मंदिराच्या सभागृहाचे लोखंडी गेटचे कुलूप उघडून, मंदिराच्या गाभाऱ्याच्या दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत चोरी केल्याचे चित्रीकरणात दिसून आले. पहाटे सहा वाजण्याच्या सुमाराला चोरी झाल्याचे एका सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्याने देवस्थानचे पुजारी तुषार वैद्य यांना ही बाब कळविली. दुपारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी घटनास्थळाला भेट दिली.
टोप, छत्री, मासोळ्या, पंचारती, उत्सव मूर्ती, श्रीयंत्र, सिंहासन , दंड आदी चांदीच्या वस्तू चोरीस गेल्या आहेत.
मंदिर सुरक्षेचे काम एका खाजगी एजन्सीला देण्यात यां एजन्सी मध्ये वृद्ध लोकांचा जास्त भरणा असुन ते ओन ड्युटी झोपा काढत असल्याचे अनेक जनाची तक्रार आहे मंदीर परिसरात सि. सि. टीव्ही पाच सुरक्षारक्षक आणि मंदिराचे पुजारी शेतात आणि मंदिरात कामं करणारे लोक यांचा कायम राबता असतो तरी चोरी झाली यांचे आश्चर्य भाविक भक्त व्यक्त करत आहेत
चोरी झाली रात्री दोन वाजता सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आले सकाळी सहा वाजता मंदिराची सुरक्षा राम भरोसे "खासगी सुरक्षा संस्थेचे जागते रहो का सोते राहो"
Tags :
14075
10





