पाथर्डी तालुका दुष्काळ जाहीर करा.- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन
पाथर्डी- प्रतिनिधी
काल महाराष्ट्र शासनाने राज्यातील दुष्काळी परिस्थितीत काही तालुक्यांचा दुष्काळ जाहीर केला असून त्यामध्ये पाथर्डी तालुक्याचा समावेश नाही. आता झालेल्या पावसाळ्यात पाथर्डी मध्ये दुष्काळी परिस्थिती आहे अनेक भागात पावसाअभावी पेरण्या झालेल्या नाहीत तसेच तिथे थोड्याफार झाल्या होत्या तिथेही पिके त्यात आलेली नाहीत कडधान्य फळबागा,सोयाबीन, कपाशी ऊस आणि इतर पिके वाया गेली आहेत त्यामुळे तहसिलदार शाम वाडकर यांना महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. शासनाला तातडीने प्रस्ताव पाठवून पाथर्डी तालुका दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अन्यथा मोठे जन आंदोलन करण्यात येईल.असे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी सांगितले.यावेळी महिला जिल्हाध्यक्ष योगिता राजळे, सविता चंद्रकांत बापकर महीला तालुका अध्यक्ष सविता चंद्रकांत बापकर,
युवती तालुका अध्यक्ष ज्योती राजेंद्र जेधे
तसेच इतर पदाधिकारी,कार्यकर्ते ,शेतकरी उपस्थित होते.