पोलीस भरतीसाठी सराव करत होते तरुण, अचानक भरधाव वाहन आलं अन् पोलीस भरतीचं स्वप्न अधुरच राहिलं !
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कर्जत-राशीन महामार्गावर ही भीषण घटना घडली. आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बेनवडी फाट्याजवळच्या बुवासाहेब नगर येथे तिघे तरुणा रस्त्याच्या कडेला व्यायाम करत होते.
यावेळी अनियंत्रित अज्ञात वाहनाने तिघांना चिरडले. या अपघातात ओम प्रकाश धुमाळ आणि संतोष गदादे या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर केदार गदादे हा तरुणा गंभीर जखमी झाला. अपघातातील सर्व तरुण बेनवडी येथील रहिवासी आहेत.
पोलीस भरतासाठी सराव करत होते तरुण
जखमी तरुणाला मेहराज पठाण यांच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी कर्जतला नेण्यात आले. मयत तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी राशीन येथील शेखर जाधव यांच्या रुग्णवाहिकेतून कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. सर्व युवक हे पोलीस भरतीसाठी सराव करत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. मात्र या घटनेमुळे त्यांचं पोलीस भरतीचं स्वप्न कायमचं अधुरच राहिलं.