महाराष्ट्र
स्त्रियांनी समाज कार्यासाठी पुढे यावे.- मनिषा डांभे
By Admin
स्त्रियांनी समाज कार्यासाठी पुढे यावे.- मनिषा डांभे
पाथर्डी- प्रतिनिधी
जुन्या काळापासून स्त्रिला चूल आणि मूल यापलीकडे जाऊ दिले नाही आता स्त्रीयांनी स्वावलंबी बनून उंच भरारी घेतली पाहिजे समाजकार्यात अग्रेसर होवून वेगळा ठसा उमटविला पाहिजे असे उदगार सामाजिक कार्यकर्त्या मनिषा डांभे यांनी काढले
पाथर्डी तालुक्यातील ढवळेवाडी येथे सौ मनिषा डांभे यांची मडिआरटी वर दुसऱ्यांदा निवड झाली असून अमेरिकेत जाण्याची संधी त्यांना मिळाली आहे त्याबद्दल त्यांचा सत्कार स्वाभिमानी मराठा महासंघ व ढवळेवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आला याप्रसंगी स्वाभिमानी मराठा महासंघाचे डॉ कृषिराज टकले, वरिष्ठ शाखा अधिकारी श्रीनिवास डंके, प्रमोद देव, डॉ शरद भोरडे, शेवगाव तालुका अध्यक्ष अनिल सुपेकर, पाथर्डी तालुका अध्यक्ष रमेश शेळके आदिंची भाषणे झाली प्रास्ताविक स्वाभिमानी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अंकुश डांभे यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी ढवळे वाडी सरपंच बाबासाहेब चितळे होते सूत्रसंचालन कवी बाळासाहेब कोठुळे यांनी केले
याप्रसंगी स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ कृषिराज टकले म्हणाले की, शिवरायांच्या स्वराज्यात आरोग्य,शेती,याला महत्व होते शेतकरी आत्महत्या करत नव्हते शिवरायांनी गरीब मावळ्यांना न्याय दिला रोजगार दिला अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अंकुश डांभे यांनी सुध्दा संघटनेचे माध्यमातून रोजगार निर्मिती करून स्वावलंबी तरूण उभे केले आहे
यावेळी मराठा भूषण चंद्रकांत महाराज लबडे, युवा जिल्हा अध्यक्ष योगेश गायकवाड, नेवासा तालुका अध्यक्ष सुदाम थोरे, प्रसिद्ध प्रमुख अमोलराजे म्हस्के, बंडू अकोलकर, किशोर लोढे, रोहीत मोटकर,अक्षय खोमणे, ज्ञानदेव आरगडे, डॉ, अनिल चिकणे,शरद थोटे,सुर्यभान ढवळे, सुभाष माने,शहाराम चितळे,भरत ढवळे, दत्तात्रय चितळे, माणिक चितळे, सुधाकर माने, संतोष शेंदुरकर,प्रा,शेख,आदि उपस्थित होते.
Tags :
26488
10