पायी येणाऱ्या मोहटादेवी भक्तांना सोनटक्के मित्र मंडळाच्यावतीने फराळाचे वाटप
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी शहरातील अर्जुना लॉन्स कार्यालय येथे गणेशतात्या सोनटक्के मित्र मंडळ व अर्जुना युवा प्रतिष्ठानच्या वतीने शेवगाव रस्त्याने येणाऱ्या मोहटादेवी भक्तांना सहाव्या माळीस फराळाचे वाटप करण्यात आले.
मोहटादेवी गडावर पायी येणारे भक्तगण यांची अर्जुना लॉन्स कार्यालय येथे फराळासाठी लक्षणीय गर्दी दिसून आली. फराळाच्या पदार्थांमध्ये केळी, खिचडी, चहा अशी व्यवस्था मंडळांनी केली होती. थकलेल्या प्रवाशांना चहापाण्याची व्यवस्था चोख बजावली. अतिशय शिस्तीत गणेश तात्या मित्र मंडळाचे सदस्य प्रत्येक पायी येणाऱ्या भक्तांची विचारपूस करून फराळाचे वाटपाचे पुण्यकर्म करत होते. सायंकाळी सहा वाजता ह. भ. प. मोहन महाराज सुडके यांचे हस्ते फराळाच्या वाटपाचे उद्घाटन झाले. मोहटादेवी गडावर येणाऱ्या भक्तांना रात्री बारा वाजेपर्यंत भरावाचे वाटप करण्यात येत होते.
यावेळी धरमचंद गुगळे, माऊली सोनटक्के, बाबासाहेब सोनटक्के, श्री लाड, बंडू चिंतामणी, श्री कीर्तने, ग्रामविस्तार अधिकारी रोकडे, अण्णा हारेर, बहादुरभाई आतार,अभय मुळे, फिरोज पठाण, संजय फुलारी, मेजर एडके, सुनिल तरटे, भारत पुंड, काशिनाथ सोनटक्के, विघ्ने फिटर, रोहन कर्नाटक, मनोज सोनटक्के, अजिनाथ पुंड, आकाश एडके, पवन शिरसाट, निखिल चिंतामणी, विकास बडे, नंदू सोनटक्के, भैय्या सोनटक्के, शुभम बडे, राहुल कुसळकर, सावता सोनटक्के, राजेंद्र तळेकर, बाबासाहेब निमसे, विजय आव्हाड आदींची उपस्थिती होती.
अमोलभैया सोनटक्के मित्र मंडळाने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.