फोनपेद्वारे लुटले 1 लाख 15 हजार ; क्यू आर कोड स्कॅन करून चोरी करण्याचा नवा फंडा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
एका खासगी आरोग्य विमा कंपनीच्या व्यवस्थापकाला चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले. हा प्रकार शुक्रवारी रात्री आठ वाजता मोहटा देवी फाट्याजवळ पाथर्डी-चिंचपूर रस्त्यावर घडला.
आरोपींनी त्यांच्या फोनवरून फोन रूपये काढून घेतले. मच्छिंद्र शिवनाथ गिते (वय 29, रा. तिनखडी, ता. पाथर्डी) असे या व्यवस्थापकाचे नाव आहे. गिते हे नगरवरून शुक्रवारी तिनखडीकडे जात असताना, मोहटा देवीचे कमानीजवळ त्यांच्या मागून मोटरसायकलवर तीनजण आले.
त्यांनी मोटरसायकल आडवी लावून मारहाण करत गिते यांना बाजूच्या शेतात नेले. तेथे धारदार हत्यार गळ्याला लावून त्यांच्या खिशातील मोबाईल बळजबरीने काढून घेतला. त्यांच्याकडून मोबाईलचा पॅटर्न लॉक उघडून मोबाईलमधील फोन पे ने बळजबरीने आरोपींच्या क्यू आर कोड स्कॅन करून एक लाख चौदा हजार 843 रूपये लुटले. त्यानंतर आरोपी गिते यांचा मोबाईल, बॅग घेऊन गेले. जाताना रूमालाने गिते यांचे हात बांधले. याबाबत गिते यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.