महाराष्ट्र
इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई भाजपात, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
By Admin
इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई भाजपात, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाई भाजपात प्रवेश केला आहे.
संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावच्या त्या सरपंच असून, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. शशिकला पवार (Shashikala Shivaji Pawar) या संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.
इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार या अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. शशिकला पवार यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सुशीला उत्तम पवार यांच्यावर 227 मतांनी विजय मिळवला आहे. नारळ या चिन्हावर निवडणूक लढवत शशिकला पवार या निळवंडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. अपक्ष उमेदवारी दाखल करत विजय मिळवणाऱ्या शशिकला पवार यांनी गावच्या विकासासाठी भाजपात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीनंतर थोरात गटाने सुद्धा शशिकला शिवाजी पवार आमच्या गटात असल्याचा दावा केला होता. मात्र आता भाजप प्रवेशानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
गावच्या विकासासाठी भाजपात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावातून शशिकला पवार या अपक्ष सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निळवंडे ग्रामपंचायतीत आमची सत्ता आल्याचा दावा केला होता. शशिकला पवार या किर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाई असून गावच्या विकासासाठी आपण निवडणूक लढवल्याचे त्यांनी स्पष्ट करत दोन्ही नेत्यांशी सलोख्याचे संबंध असल्याच म्हटले होते. दोन्ही नेत्यांनी या अगोदर देखील सहकार्य केले आहे. या पुढेही दोन्ही नेत्यांच्या सहकार्याने गावातील समस्या सोडवू असा पावित्रा त्यांनी घेतला होता. मात्र थोरातांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याने भाजपात प्रवेश करत असल्याचे शशिकला पवार यांनी म्हटले आहे.
थोरातांना मोठा धक्का
निळवंडे गाव हे कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघातील असून शशिकला पवार यांनी भाजपात प्रवेश केल्याने थोरातांना हा मोठा धक्का मानला जात आहे. संगमनेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत थोरात गटाने जिंकल्या असल्या तरी महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या तळेगाव दिघे, घुलेवाडी यासह आता निळवंडे ग्रामपंचायतीवर विखे यांनी सत्ता मिळवली आहे,
कोण आहेत इंदोरीकर महाराज? ( Who is Indurikar Maharaj? )
इंदोरीकर महाराज हे प्रसिद्ध किर्तनकार आहे. इंदोरीकर महाराज त्यांच्या मिश्लिक अंदाजातील किर्तनासाठी प्रसिद्ध आहेत. इंदोरीकर महाराजांचं मूळ नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख आहे. इंदोरीकर महाराज महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार आणि समाज प्रबोधक आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचे गाव आहे. या गावाच्या नावावरूनच त्यांना 'इंदोरीकर महाराज' असं नाव पडलं.
Tags :
20203
10