फलकेवाडी फाट्यावर
भीषण अपघात; महिलेचा जागेवरच मृत्यू
शेवगाव- प्रतिनिधी
07 जुन 2024 वार शुक्रवार शेवगाव तालुक्यातील फलकेवाडी फाटा येथे आयशर टेम्पोने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या सौ. रोहिणी अनिल फलके वय 40 यांना धडक दिल्याने जागीच ठार झाल्या . शेवगाव शहरातील प्रसिद्ध वकील श्री अनिल उर्फ बबलू फलके यांच्या त्या पत्नी होत त्यांना अपघातानंतर शेवगाव शहरातील अथर्व हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी दाखल केले असता डॉ. विकास बेडके यांनी त्यांना मृत घोषित केले.