शेअर मार्केटच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या दोघांना अटक
शेवगाव पोलिसांची कारवाई : गदेवाडी परिसरातून घेतले ताब्यात
शेवगाव : अनेकांना शेअर मार्केटच्या नावाखाली लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या दोघांना शेवगाव पोलिसांनी अटक केली आहे.
शेवगाव तालुक्यातील गदेवाडी तसेच परिसरातील अनेक नागरिकांची त्या दोघांनी फसवणूक केल्याप्रकरणी जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथ इसरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फसवणूक प्रकरणी अशोक बाबुराव कदम, लक्ष्मण उर्फ बबलू दत्तात्रय
आरोपींची खबऱ्याद्वारे मिळाली माहिती. २५ जुलैला गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक सुनील पाटील यांनी तपासाची चक्रे फिरविली. तपास कामी पथक तयार करून रवाना केले. दरम्यान, पाटील यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली.
पोलिसांना हवे असलेले दोघे गदेवाडी, बोधेगाव मिळून येतील, असे समजले. त्यांनी पथकाला सूचना करून रवाना करण्यात आले. पथक संबंधित स्थळी गेले. पोलिसांची चाहूल लागल्याने कदम, मडके यांनी पळून जाण्याचा प्रयत्न
मडके (दोघे रा. गदेवाडी, ता. शेवगाव) या दोघांना अटक करण्यात आली आहे.
केला. पथकाने त्यांना ताब्यात घेत अटक केली आहे. ट्रेडिंग कार्यालय सुरू करून गावातील तसेच परिसरातील नागरिकांना, लाखो रुपयांना गंडा घातल्याचा आरोप त्यांच्यावर
त्यांनी तालुक्यातील गदेवाडी येथे एके ट्रेडिंग या नावाने शेअर मार्केट आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे, सहायक पोलिस निरीक्षक अनिल बागुल, पोलिस सहायक निरीक्षक अमोल पवार, पोलिस कर्मचारी परशुराम नाकाडे, शाम गुंजाळ, बाप्पासाहेब धाकतोडे, संतोष वाघ, संपत खेडकर, एकनाथ गरकळ, राहुल खेडकर यांनी केली. पुढील तपास पोलिस सहायक निरीक्षक अमोल पवार
करीत आहेत.