शेवगावमध्ये जुगारअड्डय़ावर छापा, साडेचार लाखांच्या मुद्देमालासह नऊ आरोपी रंगेहाथ ताब्यात
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने तालुक्यातील चापडगाव शिवारातील जुगारअड्डय़ावर छापा टाकून नऊजणांना रंगेहाथ पकडले. त्यांच्या ताब्यातून चार लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कुंदन संभाजी मडके (वय 30, रा. सोनई सांगवी, ता. शेवगाव), बाबासाहेब एकनाथ म्हस्के (रा. आखातवाडा, ता. पैठण, जि. संभाजीनगर), भगवान बापूराव झिरपे (वय 47), भगवान अर्जुन झिरपे (वय 47, रा. कोळगाव, ता. शेवगाव ), रामकिसन नारायण कोलाळे (वय 50, रा. गदेवाडी, ता. शेवगाव), भगवान विष्णू ढाकणे (वय 43, रा. हसनापूर, ता. शेवगाव), बाप्पासाहेब त्र्यंबक विघ्ने (वय 40, रा. शेवगाव), काकासाहेब भाऊसाहेब घोरतळे (रा. बोधेगाव, ता. शेवगाव) व विनोद दत्तात्रेय नेमाणे (वय 30, रा. चापडगाव, ता, शेवगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
चापडगाव येथील गदेवाडीकडे जाणाऱया रस्त्यावरील शेतातील शेडच्या आडोशाला काहीजण 'तिर्रट' नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस अंमलदारांना कारवाई करण्याचा आदेश दिल्यानंतर तेथे छापा टाकण्यात आला. यावेळी जुगार खेळणाऱया नऊजणांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून चार लाख 66 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे, सहायक फौजदार राजेंद्र आरोळे, हेड कॉन्स्टेबल सुरेश औटी, कॉन्स्टेबल नितीन चव्हाण, नितीन चव्हाण, नितीन शिरसाठ यांनी ही कारवाई केली.