राजेंद्र बाबासाहेब पटारे व कालिदास दत्तात्रय टकले (दोघेही हत्राळ, ता.पाथर्डी) अशी आरोपींची नावे आहेत. अरुण भगवान बोरुडे (अमरापूर, ता. शेवगाव) व संदीप गंगाधर चेडे (रा.देडगाव, ता.नेवासा) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा व रवींद्र बागूल यांनी दोन विशेष पथके तयार करून आरोपी राजेंद्र बाबासाहेब पटारे यास आखेगाव चौकात सापळा लावून ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने साथीदार कालिदास दत्तात्रय टकले याच्यासह टॅ्रक्टर चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून दोन्ही गुन्ह्यांतील चोरीचे 8 लाख रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आले आहेत.
शेवगावचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रवींद्र बागूल, विश्वास पावरा, हवालदार बाबासाहेब शेळके, नेताजी मरकड, परशुराम नाकाडे, भनाजी काळोखे, शिरसाठ, अमोल ढाळे, संपत खेडकर, राजेंद्र ढाकणे, अस्लम शेख, बप्पासाहेब धाकतोडे, रवींद्र शेळके, सोमनाथ घुगे, संभा धायतडक यांच्या पथकाने ही कारवाई केली.