187 कारखान्यांकडून 843 लाख टन ऊसाचे गाळप पूर्ण;32 साखर कारखान्यांचे धुराडे बंद
By Admin
187 कारखान्यांकडून 843 लाख टन ऊसाचे गाळप पूर्ण;32 साखर कारखान्यांचे धुराडे बंद
प्रतिनिधी - नगर सिटीझन
यंदाचे सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामात राज्यातील 187 साखर कारखान्यांनी 3 मार्च 2021 अखेर
843.86 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 869.35 लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे.राज्याचा सरासरी साखर उतारा 10.30 टक्के आहे. 32 साखर कारखान्यांचे गळीत हंगाम बंद झाले आहेत.तर चालू गळीत हंगामात राज्यात 28 फेब्रुवारी 2021 अखेर गाळप झालेल्या ऊसाची 2357.76 कोटी रुपये एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना कारखान्यांकडून देणे बाकी आहे.
यावर्षी राज्यतील साखर कारखान्याना 15 ऑक्टोबर पासून गळीत हंगाम सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली.मात्र अवकाळी पावसाने ऊस शेतात साचलेले पाणी आणि ऊस तोड कामगारांचा संप यामुळे प्रत्यक्ष ऊस गाळप 10 दिवसांनी लांबणीवर जाऊन 25 ऑक्टोबर पासून गळीत सुरू झाले.
कोल्हापूर विभाग:- 204.33-242.46- 11.87 टक्के- 02
पुणे विभाग:- 185.18-197.35- 10.66 टक्के- 01
सोलापूर विभाग- 168.87-157.03- 9.30 टक्के- 25
अ.नगर विभाग:-127.13-121.37- 9.55 टक्के-00
औरंगाबाद विभाग:- 73.96-68.68-/ 9.29 टक्के-01
नांदेड विभाग:- 75.05-74.06-9.87 टक्के- 01
अमरावती विभाग:- 5.81-5.20- 8.95 टक्के- 02
नागपूर विभाग:- 3.53-3.20- 9.07 टक्के-00
एकूण - 843.86- 869.35
नगर जिल्ह्यातील 21 कारखान्यांकडून 1 कोटी 15 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप.
नगर जिल्ह्यातील 14 सहकारी व 8 खाजगी अशा एकूण 22 साखर कारखान्यांनी 03 मार्च 2021 अखेर 1 कोटी 15 लाख 70 हजार 120 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 1 कोटी 10 लाख 36 हजार 880 क्विंटल साखर निर्मिती केली आहे.जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 09.54 टक्के आहे.
नगर जिल्ह्यातील एकूण 1 कोटी 15 लाख 70 हजार 130 मेट्रिक टन ऊसा पैकी 14 सहकारी साखर कारखान्यांनी 77 लाख 5 हजार 25 मेट्रिक टन तर 8 खाजगी साखर कारखान्यांनी 38 लाख 65 हजार 105 मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण केलेले आहे.
)ज्ञानेश्वर:-1002040-1017200- 10.15 टक्के
2)मुळा:- 914150-830050-9.08
टक्के
3)संजीवनी:- 580353-514700- 8.87 टक्के
4)कोपरगाव:- 494240-498100- 10.08 टक्के
5)गणेश:- 219150-181200-8.27
टक्के
6) अशोक:- 495270-412250- 8.32 टक्के
7)प्रवरा:-656930-507450-7.72 टक्के
8) राहुरी:- 132200-111050- 8.40 टक्के
9) श्रीगोंदा:- 615690-667150- 10.84 टक्के
10)संगमनेर:- 956490-933250- 9.76 टक्के
11) वृद्धेश्वर:- 330745-336900- 10.19 टक्के
12)अगस्ती:-443677-458580- 10.34 टक्के
13)केदारेश्वर:-293540-240900- 8.21टक्के
14) कुकडी:- 570550-573000- 10.04 टक्के
15) क्रांती शुगर(पारनेर):-153605- 160300-10.44 टक्के
16) पियुष(नगर):- 168445 -124150- 7.37 टक्के
17)अंबालिका:-1344090-1388600-10.33 टक्के
18)गंगामाई:- 902020-800450- 8.87 टक्के
19) साई कृपा नं 1:- 246920- 254100- 10.29 टक्के
20) प्रसाद शुगर:- 497490- 515950- 10.37 टक्के
21) जय श्रीराम :- 228370-194800- 8.53 टक्के
राज्यात 2357 कोटींची एफआरपी थकीत...
चालू गळीत हंगामात राज्यात 28 फेब्रुवारी 2021 अखेर गाळप झालेल्या ऊसाची 2357.76 कोटी रुपये एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना कारखान्यांकडून देणे बाकी आहे. 76 कारखान्यांनी 100 टक्के,83 कारखान्यांनी 50 ते 99 टक्के,21 कारखान्यांनी 1 ते 50 टक्के तर 7 साखर कारखान्यांना शून्य(0) टक्के एफआरपी अदा केली आहे.
नगर जिल्ह्यात 100 टक्के एफआरपी अदा करणारे कारखाने.
28 फेब्रुवारी अखेर नगर जिल्ह्यातील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना,मुळा,प्रसाद, शुगर,कोपरगाव, संगमनेर, संजीवनी, वृद्धेश्वर,अंबालिका, क्रांती शुगर या साखर कारखान्यांनी 100 टक्के एफआरपी ची रक्कम शेतकऱ्यांना अदा
केलेली आहे.