महाराष्ट्र
22350
10
जुन्यापेन्शनसाठी तहसील कार्यालयावर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोर्चा
By Admin
जुन्यापेन्शनसाठी तहसील कार्यालयावर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोर्चा
विविध प्रलंबित मागण्या संदर्भात तहसीलदारांना निवेदन
पाथर्डी प्रतिनिधी:
जुन्या पेन्शन सह इतर प्रलंबित मागण्यासाठी माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, प्राथमिक शिक्षकांनी १४ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत पाथर्डी तहसिलदार श्याम वाडकर यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलकांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या देऊन निदर्शने केली.' कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही' 'एकच विषय, जुनी पेन्शन' असे म्हणत हा मोर्चा काढण्यात आला. श्री तिलोक जैन विद्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घोषणा देऊन पायी निघालेला हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.
तहसील कार्यालय समोर झालेल्या द्वारसभेत उपस्थित प्रमुख वक्त्यानी सरकारच्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध केला. नवीन पेन्शन योजनेमुळे सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर यांची वृद्धापकाळतील जीवन उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, असे प्रतिपादन करत सरकारी धोरणाचा निषेध करण्यात आला.
गेल्या सतरा वर्षापासून हा लढा सुरू आहे. जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करा, यासह इतर प्रलंबित मागण्यासाठी समन्वय समितीच्या माध्यमातून यापूर्वी संप करण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर हा संप स्थगित करण्यात आला होता. आता सात महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी पुढील कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मिथुन डोंगरे, पीडीएफ सचिव सुभाष गव्हाणे, सहसचिव सुभाष भागवत, माध्यमिक शिक्षक संघ सहसचिव आत्माराम दहिफळे, मुख्याध्यापक पठाण ए. ए., नाकाडे आर.डी., प्राचार्य घीगे, प्राचार्य अशोक दौंड, पर्यवेक्षक पवार एन. एस., दिलावर फकीर, अजय भंडारी, उपमुख्याध्यापक विजयकुमार छाजेड, पर्यवेक्षक घारे, समाधान आराख, मुख्याध्यापक राजाराम माळी, मुख्य लिपिक महेंद्र राजगुरू, लिपिक बडदे, कचरे ए. एन., ढाकणे डी.पी., राजू सुरवसे, शिवाजी शेकडे, ईश्वर गायकवाड, अनिल पानखडे, सुभाष हंडाळ, मुख्याध्यापक बाळासाहेब खेडकर, श्रीमती भापसे, मनिषा मोरे, वृषाली कर्नावट आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Tags :
22350
10





