महाराष्ट्र
33909
10
पाथर्डी पंचायत समिती मधील प्रशासक, प्रभारी राजमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार
By Admin
पाथर्डी पंचायत समिती मधील प्रशासक, प्रभारी राजमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी पंचायत समितीमध्ये गेल्या दीड ते दोन वर्षांपासून प्रशासक राज असून प्रशासक पदावर प्रभारी पशुधन विकास अधिकारी जगदीश पालवे कार्यरत आहेत.अनेक खातेप्रमुखही प्रभारी अधिकारी आहेत.प्रभारी अधिकाऱ्यांकडून गाय गोठा, विहिरी,व वैयक्तिक लाभाच्या योजनेमध्ये ग्रामपंचायतीचा प्राधान्यक्रम डावलून अपात्र लाभार्थींना आर्थिक तडजोड करून लाभ दिला जात आहे.प्रभारी गटविकास अधिकारी डॉ.जगदीश पालवे यांचा मुलगा ऋषी पालवे हा पंचायत समिती कार्यालयामध्ये बसून घरकुलाचे कामकाज पाहतो.तोही लाभधारक व गटविकास अधिकारी यांच्यामध्ये आर्थिक तडजोड करून देत आहे.या सर्व गैरप्रकारांची उच्च स्तरीय चौकशी करावी अन्यथा २३ ऑगस्ट रोजी बैठा सत्याग्रह,आमरण उपोषण करण्याचा इशारा आम आदमी पार्टीचे किसन आव्हाड यांनी दिला आहे.
याबाबत किसन आव्हाड यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.
निवेदना म्हटले आहे की,ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकानुसार फक्त ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्याकडेच पंचायत समितीचा कार्यभार सोपविण्याचे आदेशित असताना पाथर्डी पंचायत समितीत पशुधन विकास अधिकाऱ्याकडे प्रभारी गटविकास अधिकारी या पदाचा कार्यभार सोपविला आहे.पाथर्डी पंचायत समितीतील शाखा अभियंता अनिल सानप यांच्याकडेही प्रभारी अधिकारी म्हणून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता म्हणून पाथर्डी शेवगाव,नेवासा तसेच पाथर्डी बांधकाम विभागाचाही कार्यभार आहे. शिक्षण विभाग, आरोग्य उपकेंद्रातही अनेक प्रभारी अधिकारी आहेत.पंचायत समितीमध्ये गेल्या दीड ते दोन वर्षापासून पंचायत समिती स्तरा वर पंधरावा वित्त आयोगाचे जेईएमव्दारे चुकीच्या पध्दतीने अनेक खरेद्या केलेल्या आहेत.ठराविक ठेकेदारांनाच कामे देण्यात आलेली आहेत.ग्रामपंचायतींना सुध्दा पंधरावा वित्त आयोग,दलित वस्ती,जन सुविधा,जलजीवन मिशन अशा सर्वच कामाच्या निविदा या ठराविक ठेकेदारांनाच भरण्यास सांगून त्यांनाच हे काम प्रभारी प्रशासक,उपअभियंता यांच्या आशीर्वादाने दिले जात आहेत.उपअभियंता अनिल सानप यांच्या प्रशासकीय गैरवर्तनाची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर सानप हे पंधरा दिवस पंचायत समितीत फिरकलेच नाहीत.त्यांनी पंचायत
समितीमधील कागदपत्रांचे कामकाज आपल्या घरी बसूनच केले आहे.अशा प्रकारे सर्वच विभागात अनागोंदी व मनमानी कारभार चालू आहे.केवळ वरिष्ठांना खूष करण्यासाठी दिखावा म्हणून कागदी घोडे नाचविले जात आहेत.ग्रामपंचायतींना कामे घेण्यासाठी सक्षमतेचा दाखला आवश्यक असतो मात्र अनेक ग्रामपंचायत सक्षम नसतानाही आर्थिक तडजोड करून सक्षमतेचे दाखले दिले जातात.पाथर्डी पंचायत समितीमध्ये कायमस्वरुपी गटविकास अधिकारी व इतर विभागातही कायमस्वरुपी अधिकारी नियुक्त करावेत.तसेच प्रभारी अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचारा ची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
Tags :
33909
10





