कवडदरा विद्यालयात 74 वा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
नाशिक - प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज मध्ये 26 जानेवारी 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यालयात ध्वजारोहण प्राचार्य व्ही.एम.कांबळे सर यांनी केले .
यावेळी गावातुन सर्व विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढत 'भारत माता की जय', जय जवान जय किसान अशा अनेक घोषणा दिल्या.
प्रजासत्ताक दिनानिम्मित विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे नृत्य, कला सादर करत
कार्यक्रमाला आलेले मान्यवर, पालक ,माजी विद्यार्थी , यांची मने जिंकली.अशा प्रकारे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाला मान्यवर ,ग्रामस्थ ,माजी विद्यार्थी ,सरपंच ,पोलिस पाटील,अंगणवाडी सेविका,आरोग्य सेवक कर्मचारी ,वैद्यकीय अधिकारी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.