महाराष्ट्र
गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच मागणाऱ्या पोलीस हवालदार विरूद्ध पाथर्डी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल
By Admin
गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच मागणाऱ्या पोलीस हवालदार विरूद्ध
पाथर्डी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच मागणाऱ्या पोलीस हवालदार विरूद्ध पाथर्डी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल
तक्रारदार- पुरुष वय- 28 रा -माळी बाभूळगाव ता- पाथर्डी जि.अहमदनगर
▶️ आरोपी - संजय जनार्धन बडे, वय - 52 वर्षे, पोलीस हवालदार,
नेमणूक-उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,शेवगाव
रा.वामानभाऊ नगर,पाथर्डी जि अहमदनगर
▶️ लाचेची मागणी- ५००००/-₹ तडजोडी अंती ₹ ४००००/-
▶️ लाचेची मागणी - ता.१३/०७/२०२२
▶️ लाचेचे कारण -.तक्रारदार व त्यांचे भागीदार मित्र हे भागीदारी मध्ये jजेसीबी व्यवसाय करतात, त्यांनी जेसीबी ने अवैध रित्या मुरुम उत्खनन केले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी व त्यांचा जेसीबी जप्त न करण्यासाठी तक्रारदार यांचेकडे ५००००/- रु ची लाच मागणी केली. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक १३/०७/२०२२ रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये आरोपी लोकसेवक याने पंचासमक्ष ५००००/- ₹ लाचेची मागणी करुन तडजोडी अंती ₹ ४००००/- रु लाच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविली म्हणून आज दिनांक ०३/०८/२०२२ रोजी आरोपी लोकसेवक यांचे विरुद्ध पाथर्डी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
▶️ सापळा अधिकारी:- शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर
▶️ पर्यवेक्षण अधिकारी* हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर
▶ सापळा पथक:- पो अंमलदार
रमेश चौधरी, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चालक पो ना राहुल डोळसे.
▶ *मार्गदर्शक -*मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
▶मा. नारायण न्याहळदे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक.
▶️ मा:- सतिश भामरे, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
▶ आरोपीचे सक्षम अधिकारी- मा पोलीस अधीक्षक, अहमदनगर.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर
दुरध्वनी- ०२४१- २४२३६७७
@ टोल फ्रि क्रं. १०६४
Tags :
14703
10