श्री रत्न जैन विद्यालयांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
पाथर्डी प्रतिनिधी
श्री तिलोक ज्ञान प्रसारक मंडळ संचलित, माणिकदौंडी येथील श्री रत्न जैन विद्यालयात नुकताच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम माळी यांनी केले. दोन वर्षापासून कोरोना परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीबद्दल चिंता व्यक्त करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
तसेच दहावीचे वर्गशिक्षक लक्ष्मण आरणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हटले, 'मुलांनो, वास्तववादी जीवन जगा. या शाळेचे अनेक विद्यार्थी इंजिनियर, शिक्षक, पोलिस अधिकारी, प्राध्यापक, आरोग्य खात्यात, कृषी खात्यात आहेत. तर एक विद्यार्थी जिल्हाधिकारी झालेला आहे. ते घडले तुम्ही पण घडा. वेळ कोणासाठी थांबत नाही. वेळ बहुमूल्य आहे. वेळेचा सदुपयोग करा. यशवंत व्हा, गुणवंत व्हा. आई वडिलांची सेवा करा. चांगले गुण स्विकारून त्याचे आपल्या जीवनात आचरण करा. तुम्ही या शाळेतून बाहेर पडतांना नक्कीच या संस्थेचा लौकिक वाढविताल'.
यावेळी पूजा धनगर व निकिता सोनाळे या विद्यार्थिनीने शाळा व शिक्षकांबद्दल मनोगत व्यक्त केले. तसेच सुमित फलके, सूर्यभान दहिफळे, संजय राठोड या शिक्षकांचे मार्गदर्शनपर भाषणे झाली. शेवटी सर्वांचे आभार विद्यालयातील शिक्षिका सुधा खामकर यांनी मानले.
या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे शिक्षक अविनाश नरवडे, नवनाथ बुचकुल, प्रदीप कीर्तने, निलेश शिरसाट, महावीर कर्नावट, संदीप खेडकर, प्रशांत रक्ताटे, अनिता घोलप, संगीता मोरे, करुणा कोकाटे व विद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.